काजोलने केला मुलगी निसाचा 'क्वारंटाईन टेप्स' व्हिडिओ शेअर..

टीम ई सकाळ
सोमवार, 29 जून 2020

अभिनेता अजय देवगणची मुलगी निसा देवगण सोशल मिडियावर चर्चेत असते. नुकताच निसाचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो काजोलने तिच्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

मुंबई- बॉलीवूडमध्ये सध्या स्टारकिड्सवरुन मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. त्यातंच आता आणखी एका स्टारकिडचं नाव चर्चेत येतंय. अभिनेता अजय देवगणची मुलगी निसा देवगण सोशल मिडियावर चर्चेत असते. निसाने तिचा कोणताही फोटो शेअर केला तर त्याला चाहत्यांची पसंती मिळते. नुकताच निसाचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो काजोलने तिच्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केला आहे. 

हे ही वाचा: आलिया भट्ट-संजय दत्त स्टारर 'हा' सिनेमा होणार ऑनलाईन रिलीज

निसाचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निसा तिच्या आई-वडिलांबद्दल सांगत आहे. सोबतंच तिचं आई-वडिलांसोबत कसं नातं आहे याबद्दल देखील सांगत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचं नाव आहे 'क्वारंटाईन टेप्स.'

या व्हिडिओमध्ये काजोल आणि निसाचे वेगवेगळे फोटो पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये निसा सांगतेय, 'मी अटेंशन घेत मोठी झाली आहे. भलेही माझ्या आई-वडिलांना मला आंधळं केलं मात्र मला हे समजण्याची एकही संधी दिली नाही की लोक मला ओळखत आहेत आणि कोणामुळे.निसा वडिल अजय देवगण यांच्याबद्दल सांगते की, माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला त्यातला एक म्हणजे माझं शांत राहणं. त्यांनी मला नेहमी हाच विश्वास दिला की जर मी कोणत्याही गोष्टीसाठी खूप मेहनत केली तर मी काहीही मिळवू शकते.'

या व्हिडिओमध्ये तीने आई काजोलबद्दल देखील सांगितलं आहे. निसा सांगते, 'मला असं वाटतं की मी अगदी माझ्या आईसारखी आहे. मला असं वाटतं की ती नेहमी दिलखुलास राहते. मला माहित आहे ती आम्ही दोघी खूप लाऊड आहोत आणि आमच्या आयुष्यात कोणतंच फिल्टर नाहीये.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Quarantine Tapes with my baby ! Thank you @pearlmalik22 for doing this !

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

निसाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. चाहत्यांना अजय आणि काजोलबद्दल निसाकडून या गोष्टी ऐकायला आवडत असल्याने या व्हिडिओला चांगली पसंती मिळतेय.   

kajol share quarantine tapes of nysa devgn reveals about ajay devgn and kajol  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kajol share quarantine tapes of nysa devgn reveals about ajay devgn and kajol