अभिनेत्री काजोल भारत सोडण्याच्या तयारीत, मुलीसाठी घेतला 'या' देशात राहण्याचा निर्णय

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 1 September 2020

अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांना देखील त्यांची मुलगी निसाची चिंता सतावतेय. आणि म्हणूनंच अभिनेत्री काजोलने तिच्या मुलीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई- संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपल्या कुटुंबाच्या चिंतेत आहेत. बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांना देखील त्यांची मुलगी निसाची चिंता सतावतेय. आणि म्हणूनंच अभिनेत्री काजोलने तिच्या मुलीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

हे ही वाचा: अभिनेता गौरव चोप्राला पितृशोक, १० दिवसांपूर्वीच झालं होतं आईचं निधन  

अभिनेत्री काजोल मुलगी निसामुळे आता भारत सोडण्याच्या तयारीत आहे. काजोल सिंगापूरला जाण्याची तयारी करत असल्याचं कळतंय. निसा सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र सध्या ती तिच्या आई-वडिलांसोबत भारतातंच राहतेय. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काजोलला यावेळी मुलगी निसाला एकटीला सिंगापूरला पाठवायची इच्छा नाहीये. त्यामुळे ती स्वतः निसासोबत काही काळासाठी सिंगापूरमध्ये राहणार आहे. तर दुसरीकडे अजय देवगण मुलगा युगसोबत मुंबईतंच राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

निसा सिंगापूरमधील 'युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ ईस्ट एशिया'मध्ये शिक्षण घेत आहे. सोशल मिडियावर निसा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. मिडिया रिपोर्ट्सनुसार अजय देवगणने मुलगी निसासाठी सिंगापूरमध्ये दोन वर्षांपूर्वीच एक फ्लॅट घेतला होता. तिथेच काजोल आणि निसा आता राहण्याचं प्लानिंग करत आहेत. अजय देवगण सध्या त्याच्या आगमी प्रोजक्ट्समध्ये बिझी असल्याने त्याला मुंबईतंच राहावं लागणार आहे. अजय सध्या 'भूज-द प्राईड ऑफ इंडिया' आणि 'मैदान' सारख्या सिनेमांवर काम करत आहे.   

kajol will shift with daughter nysa in singapore due to coronavirus pandemic  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kajol will shift with daughter nysa in singapore due to coronavirus pandemic