Kalank : 'कलंक'चा ट्रेलर प्रदर्शित; 40 च्या दशकाची कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

चित्रपटाची कथा नेमकी काय असणार आहे हे तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल, पण प्रेमाच्या नात्यातील दुरावा आणि एकमेकांसाठीचा त्याग याविषयी 'कलंक'मध्ये ड्रामा बघायला मिळणार आहे, हे ट्रेलरवरुन दिसत आहे. 

'कलंक' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट एक ऐतिहासिक काल्पनिक कथा असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या गाण्यांनीही प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता ट्रेलरमधून चित्रपटाची भव्यता दिसून आली आहे. 

आलिया भट हिच्या संवादाने ट्रेलरची सुरवात होते. 'मी रागात घेतलेल्या एका निर्णयाने आमच्या सगळ्यांचे आयुष्य उध्वस्त केले' असे म्हणत ट्रेलर पुढे सरकतो आणि या निर्णयाने चित्रपटातील सगळ्यांच्या आयुष्यात कसे बदल होतात हे दाखविले आहे. चित्रपटाची कथा नेमकी काय असणार आहे हे तर चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल, पण प्रेमाच्या नात्यातील दुरावा आणि एकमेकांसाठीचा त्याग याविषयी 'कलंक'मध्ये ड्रामा बघायला मिळणार आहे. 

तरी चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर ही 40 च्या दशकाची कथा असल्याचे कळते. चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या 17 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक'चे निर्माते करण जौहर आणि साजिद नाडीयाडवाला आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalank Films Official Trailer Release