'कलंक'चे पहिले पोस्टर पाहिले का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 March 2019

या पोस्टरवर वरुणच्या कानात बाळी, डोळ्यात काजळ आणि केस लांब आहेत. तर दुसऱ्या पोस्टरवर आदित्य आगीच्या समोर गंभीर अन् काहीसा खंबीर हावभावात बघत आहे. 

धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत 'कलंक' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. नुकताच चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. एका पोस्टरवर अभिनेता वरुण धवन आणि दुसऱ्या पोस्टरवर अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव हे गंभीर आहेत.

करण जोहरने ट्विट करत हे पोस्टर प्रदर्शित केले. वरुण असलेल्या पोस्टरवर करण म्हणतो, 'जफर च्या भूमिकेत वरुण धवन सादर आहे. जीवन आणि धोका यांच्यासोबत तो झुंजत असतो.' या पोस्टरवर वरुणच्या कानात बाळी, डोळ्यात काजळ आणि केस लांब आहेत. तर दुसऱ्या पोस्टरवर आदित्य आगीच्या समोर गंभीर अन् काहीसा खंबीर हावभावात बघत आहे. 
 

 

कलंक ही मल्टीस्टारर चित्रपट आहे. वरुण आणि आदित्यसह आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, कुणाल खेमू, हितेन तेजवानी, माधुरी दिक्षित नेने यांच्या मुख्य भूमिका आहेत. 19 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होईल. अभिषेक वर्मन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalank first look poster release Karan Johar introduces Varun Dhawan as Zafar