Ghar More Pardesiya : 'कलंक'चे पहिले गाणे प्रदर्शित; आलिया भटने केले कथ्थक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 March 2019

अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि आलिया भट यांची या गाण्यात जुगलबंदी दिसते आहे. दोघींच्याही कथ्थक करतानाचे हावभाव मोहून टाकणाऱ्या आहेत. तसेच वरुण धवन हाही या गाण्यात दिसत आहे.

सध्या 'कलंक' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. बॉलिवूडमधील नवीन आणि जुन्या कलाकारांचा मेळ या चित्रपटात पोस्टर वरुन दिसलाच. या चित्रपटाचे 'घर मोरे परदेसिया' हे गाणे नुकताच रिलीज झाले आहे. बहुप्रतिक्षित 'कलंक'चे हे पहिले रिलीज झालेले गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे सोशल मिडीयावर पहायला मिळाले. 

काही क्षणांपूर्वीचे यु ट्यूबवर धर्मा प्रोडक्शनतर्फे 'घर मोरे परदेसिया' रिलीज करण्यात आले. अभिनेत्री माधुरी दिक्षीत आणि आलिया भट यांची या गाण्यात जुगलबंदी दिसते आहे. दोघींच्याही कथ्थक करतानाचे हावभाव मोहून टाकणाऱ्या आहेत. तसेच वरुण धवन हाही या गाण्यात दिसत आहे.

 

'घर मोरे परदेसिया' हे गाणे श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांनी गायले आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याला शब्दबध्द केले आहे. नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा यांनी गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. संपूर्ण चित्रपटाला संगीतकार प्रीतम यांनी संगीत दिले आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक'चे निर्माते करण जौहर आणि साजिद नाडीयाडवाला आहेत. 

'कलंक' या चित्रपटाच्या निर्मितीवर 80 कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची कथा मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. तरी चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर ही 40 च्या दशकाची कथा असल्याचे कळते. चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या 17 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.


 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalank first song Ghar More Pardesiya released