KRK on Pathaan Movie: 'पठाण' पाहिल्यावर मानसिक संतुलन गेलं की काय? केआरकेने उधळली शाहरुखवर स्तृतीसुमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK and Shah Rukh Khan

KRK on Pathaan Movie: 'पठाण' पाहिल्यावर मानसिक संतुलन गेलं की काय? केआरकेने उधळली शाहरुखवर स्तृतीसुमन

KRK on Pathaan Movie: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा लोकप्रिय चित्रपट 'पठाण' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत 'पठाण'साठी सगळेच उत्सुक दिसत आहेत. सोशल मीडियावरही 'पठाण' नावाचे वादळ आले आहे, त्यामुळे सगळेच 'पठाण'चे कौतुक करत आहेत.

दरम्यान, कमाल रशीद खान म्हणजेच केआरके, जो अनेकदा आपल्या ट्विटद्वारे बॉलीवूड चित्रपट आणि सेलिब्रेटींवर निशाणा साधतो, मात्र आता त्याने 'पठाण' बद्दल पलटी मारली आहे.

कमाल रशीद खानने बुधवारी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाविषयी लेटेस्ट ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले आहे की, 'मी 'पठाण' चित्रपट मध्यांतरापर्यंत पाहिला आहे.

हे आग, शानदार आणि मनोरंजनाने भरलेले आहे. मी या चित्रपटाला पूर्वार्धापर्यंत 4 रेटिंग देतो. अशातच कालपर्यंत 'पठाण'ला कडाडून विरोध करणाऱ्या केआरकेने शाहरुख खानच्या या चित्रपटावर जोरदार पलटी मारत 'पठाण'चे कौतुक केले आहे.

हेही वाचा: Kangana Ranaut On Twitter: कंगना ऑन फायर मोड! ट्विटरवर परताच बॉलिवूडवर निशाणा...

कमाल रशीद खानच्या 'पठाण'बाबतची ही प्रतिक्रिया पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण याआधी अनेकवेळा त्याने शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट आपत्तीजनक आणि फ्लॉप असल्याचे म्हटले होते. अशा परिस्थितीत केआरकेच्या या ट्विटवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

केआरकेच्या तोंडून 'पठाण'ची स्तुती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. अशा स्थितीत या प्रकरणावर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दरम्यान, एका यूजरने कमेंट केली आहे की- 'हे धक्कादायक आहे, पठाण पाहिल्यानंतर अचानक तुमचे विचार कसे बदलले.' आणखी एका युजरने लिहिले की, 'केआरके तू ठीक आहेस.' अशाप्रकारे सर्व यूजर्स केआरकेच्या ट्विटवर कमेंट करत आहेत.

टॅग्स :Shah Rukh KhanKRK