Kangana Ranaut On Twitter: कंगना ऑन फायर मोड! ट्विटरवर परताच बॉलिवूडवर निशाणा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut On Twitter

Kangana Ranaut On Twitter: कंगना ऑन फायर मोड! ट्विटरवर परताच बॉलिवूडवर निशाणा...

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत ही तिच्या सडेतोड भाष्य करण्यासाठी ओळखली जाते.अभिनेत्री कंगना रणौत ट्विटरवर परतली आहे. ट्विटरकडून अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर हँडल स्थगित करण्यात आलं होतं.

ट्विटरवर परतल्यावर कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. पठाणच्या रिलिज दरम्यान तिचं हे ट्विट आलयं मात्र तिने कुठेही पठाणचा उल्लेख केलेला नाही.

कंगनाने काही ट्विटद्वारे आपली बाजू मांडली. यामध्ये बॉलीवूडच्या सर्जनशीलतेवर निशाणा साधला असून चित्रपटाचे यश हे नेहमीच आकड्यांच्या आधारावर मोजले जातं , गुणवत्तेवर नाही अशी खंत व्यक्त केली.

हेही वाचा: Pathaan Movie Release: पठाण जोमात बॉयकॉट गँग कोमात! शाहरुखच्या एन्ट्रीन थिएटर झिंगाट..

कंगना म्हणाली, 'फिल्म इंडस्ट्री एवढी मूर्ख आहे की जेव्हा त्याना सस्केस यशाचे प्रोजेक्ट करायचे असतात तेव्हा आपल्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष केंद्रित न करता ते नेहमी अंकांची चमक तुमच्या चेहऱ्यावर दाखवू लागतात. जणू कलेचा दुसरा हेतूच नाही. चित्रपटसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे, हेच यावरून स्पष्ट होते.'

हेही वाचा: Pathaan: कतरिनाने केली 'पठाण' च्या मिशनची पोलखोल! दीपिका म्हणाली...

पुढे ती म्हणाली, 'सर्व प्रथम कलेचा जन्म मंदिरांमध्ये झाला आणि त्यानंतर ती साहित्य आणि नाट्यापर्यंत पोहोचली. ही फिल्म इंडस्ट्री आहे जी केवळ व्यवसायासाठी तयार करण्यात आलेली नाही. केवळ बिलियन-ट्रिलियन डॉलर्स कमवण्यासाठी ते बनवले गेले नव्हते.'

हेही वाचा: Pathaan Movie Release: इंदूरमध्ये पठाणचे अनेक शो रद्द, थिएटरला आग लावण्याची धमकी तर प्रेक्षकांना पळवले..

'म्हणूनच कलेचा नेहमीच आदर केला जातो आणि कोणत्याही मोठ्या उद्योगपतीचा नाही. जरी कलाकारांनी देशाची कला आणि संस्कृती दूषित केली असली तरी, त्यांनी ते निर्लज्जपणे करू नये तर विवेकबुद्धीने केले पाहिजे..." '

गेल्या वर्षीपासून कंगना दिग्दर्शनाच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटावर काम करत आहे. चित्रपट बनवण्यासाठी त्याने आपली संपत्ती गहाण ठेवल्याचा खुलासा नुकताच केला. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.