ड्रग प्रकरणात नाव आल्याने अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची हायकोर्टात धाव, 'या' गोष्टीसाठी केलं अपील

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 17 September 2020

रकुलने तिच्या याचिकेमध्ये म्हटलं आहे की तिला शूट दरम्यान माहिती मिळाली की तिचं आणि सारा अली खानचं नाव रियाने घेतलं होतं आणि मिडियाने बातमी चालवायला सुरु केली.

मुंबई- ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये तिच्याविरोधात होत असलेलं मिडिया कव्हरेज थांबवण्याची मागणी केली आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न का केला जातोय? असं तिने या याचिकेत म्हटलं असल्याचं कळतंय. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे.  

हे ही वाचा:  ड्रग्स प्रकरणामुळे करण जोहरच्या अडचणींमध्ये होणार वाढ, 'त्या' पार्टीच्या तपासाची होतेय मागणी  

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने याचिकेमध्ये म्हटलंय की, रिया चक्रवर्ती प्रकरणात तिचं नाव आल्यानंतर मिडिया ट्रायल सुरु झालं आहे. हायकोर्टात याचिका केली आहे की सूचना आणि प्रसारण मंत्रालयला आदेश द्यावेत कि तिच्या विरोधात मिडिया कव्हरेज केलं जाऊ नये. रकुलने तिच्या याचिकेमध्ये हे देखील म्हटलं आहे की तिला शूट दरम्यान माहिती मिळाली की तिचं आणि सारा अली खानचं नाव रियाने घेतलं होतं आणि मिडियाने बातमी चालवायला सुरु केली.

रकुलप्रीत सिंहच्या वकिलांनी हायकोर्टाला सांगितलं की मिडिया रकुलप्रीतला त्रास देत आहे. कोर्टाने रकुलला हे देखील विचारलं की तिने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार का दिली नाही? या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने सर्व मिडिया चॅनल्सना संयम राखण्यासाठी सांगितलं आहे. हायकोर्टाने केंद्र सरकार, नॅशनल ब्रॉडकास्ट असोसिएशन, प्रसार भारती, प्रेस काऊन्सिल यांना सांगितलं आहे की मिडिया चॅनल्सना अंतरिम दिशानिर्देश द्यावेत.   

rakulpreet singh files plea in delhi highcourt in drug case rhea chakraborty  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakulpreet singh files plea in delhi highcourt in drug case rhea chakraborty