Kamal Haasan Thug Life: कमल हसन यांच्या वाढदिवशी नवीन सिनेमाची घोषणा, ३५ वर्षानंतर मणी रत्नमसोबत करणार काम

कमल हसन यांच्या वाढदिवसाला नवीन सिनेमाची घोषणा झालीय
kamal haasan thug life new movie announced directed by mani ratnam
kamal haasan thug life new movie announced directed by mani ratnamSAKAL

Kamal Haasan New Movie Thug Life News: कमल हसन यांचा आज वाढदिवस. कमल हसन यांनी गेली अनेक वर्ष विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. कमल हसन यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांना अनोखी भेट मिळाली आहे.

कमल हसन यांच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाचं नाव आहे ठग लाईफ. कमल हसन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या सिनेमाची घोषणा झालीय.

kamal haasan thug life new movie announced directed by mani ratnam
Kiran Mane: दहा फ्लाॅप आणि एखादा हिट देणारा 'सुपरस्टार' कसा? किरण मानेंची सणसणीत पोस्ट

ठग लाईफ सिनेमाच्या निमित्ताने कमल हासन आणि मणिरत्नम हे 35 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. 6 नोव्हेंबर रोजी, मणी रत्नम - कमल हसनच्या आगामी सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे अधिकृत टायटल - 'ठग लाइफ'ची घोषणा केलीय. चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले असुन कमल हसन कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसुन येत आहेत.

ठग लाईफ सिनेमाच्या टायटल व्हिडीओची घोषणा झालीय. या सिनेमात कमल हसन समुराय अवतारात दिसत आहेत. ते गुंडांना खास अवतारात अस्मान दाखवत असुन कमल हसन यांच्या व्हिडीओवर प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

ठग लाईफ मध्ये कमल हसन यांच्याशिवाय डुलकिर सलमान सुद्धा प्रमुख भुमिकेत झळकणार आहे

kamal haasan thug life new movie announced directed by mani ratnam
Jhimma 2 Marathi Pori Song: "मराठी पोरी दुनियेला दाखवतील माज" झिम्मा 2 मधलं पहिलं धम्नाल गाणं बघाच

माईलस्टोन 'नायकन' सिनेमानंतर, कमल हसन आणि मणिरत्नम या सिनेमाच्या निमित्ताने ३५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. 'ठग लाइफ' ची निर्मिती राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज, रेड जायंट मुव्हीज, आर महेंद्रन आणि शिव अनंत यांनी संयुक्तपणे केली आहे.

संगीतकार ए आर रहमान या सिनेमाच्या संगीताची धुरा सांभाळणार आहेत. याशिवाय सिनेमॅटोग्राफर रवी के चंद्रन, एडिटर श्रीकर प्रसाद आणि स्टंट कोरिओग्राफर जोडी अनबारीव यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com