Kamal Hassan : 'मला ती भूमिका करायची नाही'! कमल हासन यांनी शाहरुखच्या 'त्या' चित्रपटातील रोलसाठी दिला होता नकार

दिग्दर्शक फराह खाननं त्या भूमिकेसाठी पुढे नसिरुद्धीन शहा, नाना पाटेकर यांनाही विचारणा केली होती.
Kamal Hassan And Shah Rukh Khan News
Kamal Hassan And Shah Rukh Khan Newsesakal

Kamal Hassan Rejected Shah Rukh Khan movie : कमल हासन दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील मोठं नावं. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे केवळ भारतच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर आपल्या नावाची अमीट छाप कमल हासन यांनी उमटवल्याचे दिसून आले आहे. सध्या ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून आपण बॉलीवूड आणि टॉलीवूड यांच्यातील स्पर्धेच्या बातम्या ऐकतो आहोत. टॉलीवूडच्या चित्रपटांनी घेतलेली झेप, बॉक्स ऑफिसवरील त्यांची कमाई आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद यांची बॉलीवूडपटांसोबत होताना दिसत आहे. या सगळ्यात प्रेक्षकांनी देखील गेल्या तीन ते चार वर्षांपासुन दाक्षिणात्य चित्रपटांना दर्शवलेली पसंती खूप काही सांगून जाणारी आहे.

कमल हासन यांना बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध चित्रपटामध्ये व्हिलनचा रोल ऑफर झाला होता. मात्र त्यांनी नम्रपणे त्याला नकार दिला होता. द फ्री प्रेसनं याबद्दल एक बातमी दिली आहे. कमल हासन ज्या चित्रपटामध्ये काम करणार होते तो चित्रपट प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुव्ही होता. चित्रपटाचे नाव होते मैं हु ना, प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खाननं हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यात व्हिलनच्या भुमिकेत कमल हासन यांनी काम करावे अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. मात्र काही केल्या हे शक्य झालं नाही. शेवटी ती भूमिका सुनील शेट्टीला मिळाली होती. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, सुश्मिता सेन, अमृता राव, झायद खान, किरण खेर, नसिरुद्दीन शहा, मुरली शर्मा, सतीश शहा, बोमन इराणी आणि कबीर बेदी, राखी सावंत यांच्या भूमिका होत्या.

फराहनं एका मुलाखतीमध्ये आपण मैं हु ना साठी कमल हासन यांना देखील विचारणा केली होती. मात्र त्यांनी ती भूमिका नाकारली होती. त्या म्हणाल्या की, मी सुनील शेट्टीनं जी भूमिका साकारली त्यासाठी अनेक दिग्गज अभिनेत्यांना विचारले होते. नसिरुद्दीन शहा यांनी त्या भूमिकेसाठी नकार दिला होता. त्यानंतर मी कमल हासन यांच्याकडे गेले त्यांनीही नकार दिला. शाहरुख म्हणाला होता की, ते नाही म्हणणार नाहीत.\

शाहरुखनं त्यांच्यासोबत हे राम नावाचा चित्रपट केला होता.त्यामुळे सरांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि ते मला नाही म्हणणार नाहीत. कमल हासन यांच्यानंतर आपण नाना पाटेकर यांनाही आपण विचारणा केली होती. पण त्यांनी देखील आपल्याला नाही म्हणून सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com