
गुजराती अग्निपथ योजनेला विरोध करत नाहीत, अभिनेत्याच्या ट्विटवर लोक संतापले
अग्निपथ योजनेविरोधात देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने सुरु आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या निदर्शनांचा विशेष प्रभाव पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये या निदर्शनांचा प्रभाव दिसत नाही. बाॅलीवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) याने गुजरातमध्ये निदर्शन होत नसल्याने त्यावर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. कमाल खान म्हणतो, अग्निपथ विरोधात गुजरातमध्ये (Gujarat) कोणताही विरोध होताना दिसत नाही. कारण ९९ टक्के गुजरातचे लोक लष्करात सामील होत नाहीत. (Kamal R Khan Twit On Angnipath Scheme Gujarati Not Participate In Agitation)
केआरकेच्या या ट्विटवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कराल मेहता नावाचे यूजर म्हणतात, असे यामुळे की गुजरातने निदर्शन करणाऱ्यांना पैसे देऊन निदर्शने केले जात नाहीत. तसेच ते रोजगार निर्माण करण्यात व्यस्त आहेत.
ज्यांनी आयुष्यात कधी मैदानाची एक फेरीही कधीही पूर्ण नाही केले ते अग्निपथचे फायदे सांगत आहेत, अशी प्रतिक्रिया मोहित ठाकूर यांनी दिली. एखादा चित्रपट बनवा, कितपत असे ट्विट करुन पैसे कमवण्याचे प्रयत्न कराल, असा सवाल एका यूजरने केआरकेला विचारला आहे. गुजरातचे ९९ टक्के लोक या देशाची जीडीपी वाढवणे आणि अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मेहनत करित आहेत, असे उत्तर दीपक या यूजरने दिली.