Kanal Kannan Arrested : प्रसिद्ध स्टंट मास्टर, अभिनेते कनाल यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या! काय आहे कारण?

मनोरंजन जगतातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टंट मास्टर आणि अभिनेते असणाऱ्या कनाल कन्नन यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Tollywood popular stunt master and actor Kanal Kannan arrested
Tollywood popular stunt master and actor Kanal Kannan arrestedesakal

Tollywood popular stunt master and actor Kanal Kannan arrested : मनोरंजन जगतातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टंट मास्टर आणि अभिनेते असणाऱ्या कनाल कन्नन यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेचे वृत्त व्हायरल होताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर अनेक सेलिब्रेटींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार साऊथमध्ये आपल्या स्टंटसाठी नेहमीच लोकप्रिय राहिलेल्या कनाल कन्नन यांच्यावर एका धर्मगुरुनं मुलीसोबत डान्स केल्याचा व्हिडिओ शेयर केला होता. त्यावरुन लिहिलेल्या पोस्टमुळे त्यांना पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे. कन्नन यांना नागरकोईल मधल्या सायबर क्राईम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीमध्ये, काही दिवसांपूर्वी कन्नन यांनी शेयर केलेला व्हिडिओ त्यांच्या अटकेचे कारण सांगितले जात आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

त्या व्हिडिओमुळे अनेकांनी भावना दुखावल्याचेही म्हटले होते. आता त्यातून एक धक्कादायक बातमीही समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन कन्नन यांना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वेगानं सुरु आहे. कन्नन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या परदेशी मुलीचा व्हिडिओ देखील शेयर केला होता. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आले होते. अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप कन्नन यांच्यावर करण्यात आला आहे.

Tollywood popular stunt master and actor Kanal Kannan arrested
RRR 2 चे दिग्दर्शन राजामौली करणार नाही? काय आहे कारण?

त्या ट्विटला त्यांनी कॅप्शन देताना म्हटले होते की, ही आपली धार्मिक संस्कृती आहे का, आपण सर्वांनी या गोष्टीचा बारकाईनं विचार करणे गरजेचे आहे. त्या व्हिडिओवरुन कित्येकांनी नाराजी व्यक्त केली होती. कन्नन यांच्यासारख्या कलाकारानं अशाप्रकारे प्रतिक्रिया योग्य आहे का, यातून आपण समाजामध्ये वेगळा संदेश तर देत नाही ना, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते.

Tollywood popular stunt master and actor Kanal Kannan arrested
Tarala Movie Review : 'बायकांना पुरुषांचा खांदा मिळतो कुठे?'! तरलाच्या पतीच्या डोळ्यात होतं पाणी

दुसरीकडे कन्नन यांना अटक झाल्यानंतर तामिळनाडूमधील काही संघटनांनी कन्नन यांचे समर्थन करणारी भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईचा त्यांनी विरोध केला आहे. काहींनी तर पोलीस ठाण्यासमोर जोरदार निदर्शनं देखील केली आहेत. कन्नन यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला तो यापूर्वीच कित्येक दिवस अगोदर व्हायरल झाला होता. अशी भूमिका त्या संघटनांनी घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com