RRR 2 चे दिग्दर्शन राजामौली करणार नाही? काय आहे कारण?

S. S. Rajamouli : ऑस्करपर्यत थेट धडक मारणाऱ्या राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची घोषणा करण्यात आली आहे.
 SS Rajamouli RRR makers sequel cancel deal next
SS Rajamouli RRR makers sequel cancel deal next esakal

RRR 2 Director : ऑस्करपर्यत थेट धडक मारणाऱ्या राजमौली यांच्या आरआरआर चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची घोषणा करण्यात आली आहे. त्याचे दिग्दर्शन मात्र एस एस राजामौली हे करणार असल्याची चर्चा होते. मात्र यासगळ्यात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राजामौली यांनी त्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन करण्यास नकार दिल्याचे समजते आहे.

आरआरआरच्या चाहत्यांना एकीकडे आनंदाची बातमी असताना दुसरीकडे एका गोष्टीमुळे निराशेला सामोरं जावं लागणार असल्याची चर्चा आहे. ती गोष्ट आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजामौली यांच्याबाबत. काही कारणास्तव त्यांनी आरआरआरच्या २ पार्टमधून माघार घेतल्याची बातमी समोर आली असून त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

विजयेंद्र प्रसाद यांनी तेलुगू टीव्ही चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की, आरआरआरच्या सिक्वेलचे देखील काम सुरु झाले आहे. त्यामध्ये रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांची वर्णी आहे. पहिल्या भागामध्ये याच कलाकारांची वर्णी लागली होती. त्यानंतर आता एका हॉलीवूड निर्मात्याचे नाव आरआरआरशी जोडले जात आहे. त्यामुळे राजामौली यांच्याकडे वाढणाऱ्या प्रोजेक्टमुळे त्यांना पुन्हा दिग्दर्शनासाठी तितकासा वेळ नसल्याचे दिसून येत आहे.

 SS Rajamouli RRR makers sequel cancel deal next
Tarala Movie Review : 'बायकांना पुरुषांचा खांदा मिळतो कुठे?'! तरलाच्या पतीच्या डोळ्यात होतं पाणी
 SS Rajamouli RRR makers sequel cancel deal next
Niyat Movie Review : कमजोर कथेमुळे निराश करणारा चित्रपट!

महाभारतावर राजामौली यांनी काम सुरु केलं आहे....

विजयेंद्र प्रसाद यांनी म्हटलं आहे की, राजामौली हे सध्या महेश बाबूला घेऊन एसएसएमबी २९ नावाचा चित्रपट करत आहे.त्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चाही आहे. यासगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे महेश बाबू आणि राजामौली यांच्या या प्रोजेक्टची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. एसएसएमबी २९ ही तर आरआऱआरपेक्षा मोठा चित्रपट आहे. त्यानंतर ते त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट महाभारतावर काम सुरु केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com