‘तू तर करण जोहरचा पाळीव प्राणी’; कंगणाचा दिलजितला 'डोस' 

युगंधर ताजणे
Thursday, 3 December 2020

कंगणानं सोशल मीडियावर शेतक-यांच्या विरोधात घेतलेली भूमिका त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यासंदर्भात तिचं एक व्टिट चांगलेच व्हायरल होत आहे.

मुंबई - कंगणा आणि दिलजीतची भांडणं आता सोशल मीडियावर सर्वांच्या मनोरंजनाचा विषय ठरत आहे. कंगणाच्या वाट्याला गेलेल्या दिलजीतला तिनं चांगलाच दम भरला आहे. दिल्लीतील आंदोलनाची आग आता या दोघांच्या एकमेकांवरील आरोपामुळे वाढली आहे. या दोघांनी एकमेकांवर केलेले आरोप वाचकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कंगणानं सोशल मीडियावर शेतक-यांच्या विरोधात घेतलेली भूमिका त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यासंदर्भात तिचं एक व्टिट चांगलेच व्हायरल होत आहे. दिल्लीत शेतक-यांचे जे आंदोलन सुरु आहे त्याला समाजातील वेगवेगळ्या स्तरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. शेतकरी कायद्याच्या विरोधात हा शेतक-यांनीच एल्गार पुकारला आहे, त्यावरुन एक झालेल्या शेतक-यांच्या आंदोलनात पंजाबातील एक आजीही सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावर कंगणाने व्टिट करुन टीका केली होती. त्याला त्या आजींनीही जशास तसे उत्तर दिले होते.

कंगणानं ज्या प्रकारे दिलजीतला 'डोस' दिला आहे ते पाहून दिलजीतनंही तिला प्रत्युत्तर दिलं आहे. दिलजीत म्हणाला, मला पाळीव म्हणत असली तरी तु देखील एका अर्थी पाळीवच आहे. कारण तू देखील अनेक बॉलिवूड निर्मात्यांसोबत काम केलं आहेस. याचा अर्थ तुझे अनेक मालिक आहेत. लक्षात ठेव हे बॉलिवूडवाले नाही आहेत शांत बसायला. पंजाबी आहेत. खोटं बोलून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न  न करण्याचे दिलजीतनं बजावलं आहे.बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.

अलिकडेच तिने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला विरोध केला होता. तिच्या या भूमिकेवर अभिनेता दिलजीत दोसांज याने टीका केली. मात्र त्याच्या टीकेमुळे कंगना संतापली अन् ती तिने दिलजीतला करण जोहरचा पाळीव प्राणी असं म्हटलं आहे. अर्थात यानंतर दिलजीतचा देखील संयम तुटला अन् त्याने तू देखील बॉलिवूडची पाळीव प्राण्यासारखीच आहेस असं म्हटलं.

शेवटी बाईपण सोडून 'पुरुष' व्हावं लागलं, कित्येक वर्षांपासून होती त्रस्त

‘महिंदर कौर, मी तुमचा आदर करतो. कंगणा  ऐक. बंदा इतना भी अंधा नही होना चाहिए’ अशा शब्दांत त्यानं कंगणावर टीका केली आहे.  महिंदर कौर म्हणाल्या की, कंगणाला पंजाब आणि पंजाबच्या शेतकऱ्यांची समज नाही. ती असती तर तिनं अशाप्रकारचं वक्तव्य कधी केलं नसतं. तिनं केलेलं वक्तव्य म्हणजे  डोकं नसल्याचं लक्षण आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kananga slapped to Diljit Dosanjh related Delhi farmers strike