'वेळच ठरवेल शेतक-यांच्या बाजूनं आणि विरोधात कोण आहे ते'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

अभिनेत्री कंगणानं नव्या वर्षात भलताच आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज याच्याशी पंगा घेतला होता. खरं तर त्यांच्यातील हा वाद एवढा टोकाला गेला होता की दोघांनाही एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपात शिवराळ भाषेचा प्रयोग केला होता. दिल्लीत शेतकरी विधेयकावरुन जे आंदोलन पेटले आहे ते अद्याप शांत झालेलं नाही.

मुंबई -  अभिनेत्री कंगणानं नव्या वर्षात भलताच आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज याच्याशी पंगा घेतला होता. खरं तर त्यांच्यातील हा वाद एवढा टोकाला गेला होता की दोघांनाही एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपात शिवराळ भाषेचा प्रयोग केला होता. दिल्लीत शेतकरी विधेयकावरुन जे आंदोलन पेटले आहे ते अद्याप शांत झालेलं नाही. मात्र कंगणानं पुन्हा सोशल मीडियावर खोड्या काढण्यास आणि डिवचण्यास सुरुवात केली आहे. 

दिलजीत आणि कंगणामधील वाद दोघांच्याही चाहत्यांना नवा नाही. हमरीतुमरीवर झालेल्या या वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले होते. अजूनही दोघेही शांत झालेले नाहीत. आताही कंगणानं शेतकरी आंदोलनावरुन जी टिप्पणी केली त्याला दिलजीतनं जाहिररीत्या सडेतोडपणे उत्तर दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे दोन्ही सेलिब्रेटी त्यांच्यातील वादामुळे ट्रेडिंगचा विषय झाले आहेत. या दोघांच्या चाहत्यांमध्येही यामुळे वाद रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात शेतक-यांच्या आंदोलनानं वेगळं वळण घेतलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिलजीतनं दिल्लीत शेतक-यांचं जे आंदोलन सुरु आहे त्याला पाठींबा दिला होता. इतकेच नव्हे तर त्या आंदोलनाला आर्थिक मदतही केली होती. मात्र दिलजीतनं शेतक-यांच्या आंदोलनाला दिलेला पाठींबा कंगणाला आवडला नाही. तिनं त्याच्यावर जहरी टीका केली होती. यामुळे चिडलेल्या दिलजीतनंही कंगणाला जशास तसे उत्तर दिले होते. कंगणानं त्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृध्द आजींविषयी अपशब्द वापरले होते. त्यावर कंगणाला उत्तर देताना दिलजीत म्हणाला की, माझ्याबरोबर सा-या पंजाबचा विश्वास आणि पाठींबा आहे. आणि तो नेहमीच राहिल यात कुठलेही शंका नाही. कंगणाजी, तुम्ही तुमची धारणा बदलण्याची गरज आहे. असा विचार करु नका की पंजाबबरोबर तुम्ही कशाप्रकारे वर्तन केले हे सगळ्यांना माहिती आहे. यापुढील काळात पंजाब तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे दिलजीतनं सांगितले.

बर्थ डे स्पेशल: कधी क्रिकेटर तर कधी अभिनेता, 'या' सेलिब्रिटींच्या प्रेमात वेडी झाली होती बॉलीवूडची मस्तानी

दिलजीतच्या व्टिटला कंगणानं उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, येणारी वेळ ठरवेल की कोण चूक आणि बरोबर. शेतक-यांच्या बाजूनं कोण लढले त्यांना ख-या अर्थानं कोणी पाठींबा दिला हे कळेल. तुम्ही ज्या कोणावर मनापासून प्रेम करता त्यांना तुमच्याविषयी आदर हा असतोच. दिलजीत, तुला काय वाटते की, तुझ्या सांगण्यामुळे सगळं पंजाब माझ्या विरोधात जाईल का, एवढी मोठी मोठी स्वप्नं पाहु नको. अशा शब्दांत कंगणानं दिलजीतचे कान टोचले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana and diljeet once agian twitter war break a spark