Kangana Ranaut : ट्विंकलनं केली पुरुषांची तुलना 'प्लॅस्टिकच्या बॅग' सोबत, कंगनाची आगपाखड! म्हणाली, 'जे चांदीचा चमचा घेऊन...'

ट्विंकल खन्नाच्या त्या व्हिडिओवर कंगनानं (Kangana Ranaut) तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
Kangana Reaction on twinkle khanna
Kangana Reaction on twinkle khanna esakal

Kangana Ranaut viral news: अभिनयाच्या बाबत कंगना तर बॉलीवूडच्या अभिनेत्रींमध्ये नेहमीच सर्वोत्तम ठरल्याचे दिसून आले आहे. मात्र ती तिच्या (kangana ranaut news) परखड बोलण्यासाठी ओळखली जाते. कारण कोणतं का असेना कंगनाला एखाद्या गोष्टीचा राग आल्यावर ती काहीही बोलू शकते हे तिच्या आतापर्यंतच्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आहे.

आता कंगनानं बॉलीवूडच्या खिलाडी अक्षय कुमारच्या बायको (kangana ranaut latest news) ट्विंकलसोबत पंगा घेतल्याचे दिसून आले आहे. यावेळी कंगनानं तिला चांगलेच सुनावल्याचे दिसून आले आहे. कंगनानं (kangana reaction on twinkle khanna) बॉलीवूडमधील नेपोटिझमवर कायमच निशाणा साधला आहे. तिनं वेळोवेळी त्यावरुन आपली भूमिका जाहीरपणे मांडली आहे. बॉलीवूडमधील घराणेशाहीला तिनं कडाडून विरोध केला आहे.

kangana latest news
kangana latest news

कंगनानं ट्विंकल खन्नाला नेपोटिझमवरुन खडे बोल सुनावले आहे. (bollywood latest news) कंगनानं इंस्टावर एक स्टोरी शेयर करुन आपला राग व्यक्त केला आहे. त्या पोस्टमध्ये कंगनानं ट्विंकलचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ट्विंकलनं पुरुषांची तुलना ही प्लॅस्टिक बॅगसोबत केली आहे त्यामुळे कंगना चिडली आहे. तिनं ट्विंकलला चांगलेच सुनावले आहे.

कंगनानं ट्विंकलला नेपो किड असे म्हटले असून तिच्याविषयी म्हटले आहे की, तुम्हाला काही विशेषाधिकार दिले आहेत का, म्हणून तुम्ही पुरुषांना पॉलिथिनची बॅग म्हणता आहात. यातून तुम्हाला काय म्हणायचे आहे, चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या नेपो किड्सला सोनाच्या थाळीत फिल्मी करिअर मिळालं. मात्र त्यांना ते फारसं झेपलं नाही. अशा शब्दांत कंगनानं तिची नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्रीनं म्हटलं आहे की, तुम्हाला असं सांगून काय दर्शवायचे आहे, याला तुम्ही फेमिनिझम म्हणणार का, कंगनाची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस दिल्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर ट्विंकलकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. ट्विंकलचा हा व्हिडिओ जूना असल्याचे सांगण्यात येत आहे.

अक्षयची पत्नी ट्विंकल ही सध्या बॉलीवूडमध्ये फारशी सक्रिय नाही. पण तिनं आता एक लेखिका, ब्लॉगर म्हणून स्वताची वेगळी ओळख तयार केली आहे. ती एक लोकप्रिय लेखिका म्हणून चाहत्यांची पसंती मिळवताना दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com