अनुराग कश्यप म्हणाले 'जा चीनवर हल्ला कर', कंगना म्हणाली 'अरे मंदबुद्धी...'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 18 September 2020

नुकताच कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. कंगनाच्या एका ट्विटवर अनुराग कश्यप यांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवॉर सुरु झालं.   

मुंबई- नेहमीच सोशल मिडियावर बेताल वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असलेली कंगना रनौत सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. ती जेव्हापासून बॉलीवूडमधील ड्रग्स वापराबाबत बोलली आहे तेव्हापासून ती दररोत कोणा ना कोणा बॉलीवूड सेलिब्रिटीसोबत वाद घालत आहे. आता नुकताच कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. कंगनाच्या एका ट्विटवर अनुराग कश्यप यांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवॉर सुरु झालं.   

हे ही वाचा: ऑस्करविजेत्या 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचे लेखक विन्स्टन ग्रूम यांचे निधन

कंगना रनौतने ट्विट करत म्हटलं की, 'मी एक क्षत्रीय आहे, शिर छाटू शकते मात्र कोणासमोर झुकवु शकत नाही. राष्ट्राच्या सन्मानासाठी मी नेहमीच आवाज उठवत राहिन. मान, सन्मान, स्वाभिमानसोबत जगत आहे. आणि गर्वाने राष्ट्रीयवादी म्हणून जगेन. मी कधीच तडजोड केलेली नाही आणि कधी करणार नाही. जय हिंद.'

कंगनाच्या या ट्विटवर उत्तर देत अनुराग कश्यप यांनी लिहिलं, 'बस तुच एक आहेस ताई, एकटी मणिकर्णिका, तु ना चार पाच लोकांसोबत चीनवर चढाई करुन जा. बघ किती आतपर्यंत घुसले आहेत ते. त्यांनाही दाखव जोपर्यंत तु आहेस तोपर्यंत या देशाचा केसही कोणी वाकडा करु शकत नाही. तुझ्या घरापासून LAC चा केवळ एका दिवसाचा प्रवास आहे. जा शेरनी. जय हिंद.'

अनुराग कश्यपचं हे असं उत्तर पाहून गप्प बसली तर ती कंगना कसली. तिने अनुराग यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटलं, 'ठीक आहे मी बॉर्डरवर जाते तुम्ही येणा-या ऑलिम्पिकमध्ये जा. देशाला गोल्ड मेडेल पटकवणारे हवेत. हाहाहा. हे सगळं म्हणजे बी ग्रेड सिनेमे नाहीयेत जिथे कलाकार कोणीही बनतो. तुम्ही तर मेटाफरला सिरियसली घ्यायला लागले. इतके मंदबुद्धी कधी पासून झालात. जेव्हा आपली मैत्री होती तेव्हा तर खुप हुशार होतात.'

कंगनाने अनुराग कश्यप यांना मंदबुद्धी म्हटल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही आता ट्विटरवॉर सुरु झालं आहे.   

kangana ranaut and anurag kashyap words war on twitter  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut and anurag kashyap words war on twitter