esakal | ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut
ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..
sakal_logo
By
स्वाती वेमूल

ट्विटरच्या नियमांविरुद्ध मजकूर पोस्ट केल्याने अभिनेत्री कंगना राणावतचा Kangana Ranaut ट्विटर अकाऊंट Twitter सस्पेंड करण्यात आला. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगनाने ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे. या कारवाईवर कंगनाने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. 'ते अमेरिकन आहेत आणि गोऱ्या व्यक्तींना वाटतं की सावळ्या व्यक्तींनी त्यांची गुलामी करावी, हा माझा मुद्दा बरोबर असल्याचं ट्विटरने सिद्ध केलंय', असं कंगनाने म्हटलंय. (kangana ranaut anwers on her twitter account suspension)

'तुम्ही काय विचार करायचा, काय बोलायचं आणि काय करायचं हे सर्व त्यांच्यानुसार त्यांना हवं असतं. माझा आवाज उठविण्यासाठी माझ्याकडे इतर अनेक माध्यम आहेत. त्याच माझी स्वत:ची कला अर्थात सिनेमांचाही समावेश आहे. पण हजारो वर्षांपासून अत्याचार, गुलामगिरी सहन करत असलेल्या या देशातील जनतेसाठी मला वाईट वाटतं. त्यांच्या यातनांचा काही अंत नाही', असं ती पुढे म्हणाली.

हेही वाचा : 'ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावा'; नेटकऱ्यांनी कंगनाला काढलं मूर्खात

का झाली ट्विटर अकाऊंट सस्पेंडची कारवाई?

कंगनाने तृणमूल काँग्रेस पार्टी आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ट्विट केलं होतं. तिने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. ज्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या महिलांना मारहाण केली जात होती. कंगना सतत तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. याआधीही तिच्यावर आणि तिची बहीण रंगोली चांडेल यांच्यावर ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याच आरोप करण्यात आला होता.