esakal | 'ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावा'; नेटकऱ्यांनी कंगनाला काढलं मूर्खात

बोलून बातमी शोधा

kangana

'ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावा'; नेटकऱ्यांनी कंगनाला काढलं मूर्खात

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोनाच्या Covid 19 दुसऱ्या लाटेमुळे देशभरात चिंतेचं वातावरण आहे. रुग्णांसाठी वैद्यकिय सुविधांचीही कमतरता भासू लागली आहे. कोरोनारुग्णांची संख्या अचानक वाढू लागल्याने वैद्यकिय व्यवस्थेवरही ताण पडू लागला आहे. सर्वसामान्यांपासून अनेक सेलिब्रिटीसुद्धा आपापल्या परीने रुग्णांची मदत करत आहेत. आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत Kangana Ranaut हिने देशातील ऑक्सिजनच्या Oxygen तुडवड्याबद्दल नुकतंच एक ट्विट केलं आहे. मात्र या ट्विटमुळे नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत आहेत. (kangana ranaut brutally trolled after suggesting planting trees to increase oxygen level)

काय म्हणाली कंगना?

'प्रत्येकजण जास्तीत जास्ती ऑक्सिजन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, कित्येक टन ऑक्सिजन सिलेंडर्स घेतले जात आहेत. निसर्गापासून जबरदस्तीने घेत असलेल्या या ऑस्किजनची भरपाई आपण कशी करणार? आपण आपल्या चुकांमधून आणि आपत्तींमधून काहीच शिकलो नाही असं दिसतंय', असं ट्विट करत कंगनाने झाडे लावा असा हॅशटॅग वापरला आहे. 'जे लोक या ऑक्सिजनचा वापर करत आहेत त्यांनी हवेचा दर्जा वाढवण्यासाठीही काम करावं', असंही तिने पुढच्या ट्विटमध्ये म्हटलंय.

हेही वाचा : मिनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा; सोशल मीडियावर चर्चा

कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्यावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. 'बारावीनंतर थोडं शिकली असतीस तर बरं झालं असतं', असं एकाने सुनावलं, तर 'काही दिवसांसाठी तुझा ट्विटर अकाऊंट बंद कर' असाही सल्ला दुसऱ्याने दिला.