वाढदिवसाच्या दिवशी कंगनाने दिले लग्नाचे संकेत,म्हणाली,'नवरा असा हवा..' Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana ranaut

वाढदिवसाच्या दिवशी कंगनाने दिले लग्नाचे संकेत,म्हणाली,'नवरा असा हवा..'

अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर परखडपणे विचार मांडणारी आणि चर्चेचा विषय ठरणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) आयुष्यातील जोडीदाराबद्दल खुलासा केला आहे. आदर्श जीवनसाथी कसा असावा या विषयी तिने मत व्यक्त केले आहे. देशाच्या संरक्षणार्थ सज्ज असणाऱ्या सशस्त्र दलांविषयी कंगनाला वाटणारे प्रेम, कौतुक तिने अनेकदा उघडपणे मांडले आहे. केवळ सैन्य दलावर तिचे प्रेम नसून 'गणवेशातील जवान' हा तिचा आदर्श जोडीदार आहे असे विधान तिने केले होते.

२०१७ मध्ये कंगनाने तिच्या 'रंगून' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जम्मूतील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी 'बीएसएफ' कर्मचार्‍यांशी बोलताना कंगनाने आयुष्यातील जोडीदाराबद्दलही मत व्यक्त केले. 'गणवेशातील (जवान) पुरुष माझ्यासाठी एक परिपूर्ण जीवनसाथी असेल,असे ती म्हणाली होती. अनेक महिलांना सैन्यात देशाची सेवा करणाऱ्या पुरुषांशी लग्न करायला आवडत नाही अशी खंत यावेळी बीएसएफ जवानांनी बोलून दाखवली होती. त्यावर उत्तर देताना कंगना हसली आणि म्हणाली, ' कोई बेवकूफ ही लड़की होगी जो फौजी को रिजेक्ट करेगी,' शिवाय मला तर गणवेशातील पुरुष अतिशय आकर्षक आणि परिपूर्ण वाटतात असेही ती म्हणाली. 'जवानांमध्ये कंगनाला तिचा आदर्श जीवनसाथी मिळू शकेल,' यावरून तिची खिल्ली देखील उडवण्यात आली होती .

हेही वाचा: श्रुती हासननं लग्न झाल्याचं का लपवून ठेवलं? बॉयफ्रेंडनेच केला खुलासा

विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ हा एक ऐतिसाहिक चित्रपट होता ज्यामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खानही मुख्य भूमिकेत होते. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपयशी ठरला. प्रेक्षक आणि समीक्षकांच्याही फारसा पसंतीस उतरला नाही.दरम्यान, कंगना 'थलायवी' या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने जे. जयललिता यांची भूमिका साकारली होती. त्यासाठी तिला प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुकही मिळाले होते. आगामी काळात तिचे अतिशय मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यामध्ये अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांचा समावेश असलेला 'धाकड' आणि 'तेजस' हे चित्रपट आहेत. 'तेजस' चित्रपटात कंगना हवाई दलातील पायलटची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ‘सीता: द इन्कार्नेशन’ या बहुचर्चित चित्रपटातही ती झळकणार आहे.

Web Title: Kangana Ranaut Birthday Special Speak About Her Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top