Kangana Ranaut: 'मोदी कृष्णाचा अवतार, त्यांचा जन्म हा....'! अभिनेत्री कंगना पुन्हा बोलली

तेजसच्या निमित्तानं कंगनानं ज्या मुलाखती दिल्या आहेत. त्यात तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
Tejas Actress Kangana Ranaut Feels PM Narendra Modi
Tejas Actress Kangana Ranaut Feels PM Narendra Modi esakal
Updated on

Tejas Actress Kangana Ranaut Feels PM Narendra Modi : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आता तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. नुकताच कंगनाचा तेजस नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तेजसच्या निमित्तानं कंगनानं ज्या मुलाखती दिल्या आहेत. त्यात तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यामुळे कंगना काही प्रमाणात ट्रोल देखील झाली आहे. कंगनानं मोदींचा उल्लेख कृष्णाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी तिनं मोदींची तुलना भगवान राम यांच्यासोबत केल्याचे दिसून आले होते.

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

एका मुलाखतीमध्ये कंगनानं पीएम नरेंद्र मोदींविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ती म्हणाली, माझे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. ते सर्वशक्तिमान आहेत. तुम्ही मला जेव्हा अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्यापैकी कुणाला सर्वोत्तम पंतप्रधान मानता असे विचारता तेव्हा मला मोदी यांचे नाव घ्यावेसे वाटते. मी असे म्हणते याला कारण ते देशासाठी खूपच समर्पित भावनेनं काम करतात. मोदीजी आपल्यासाठी एखाद्या अवतारासारखे आहेत. ते साधारण व्यक्तिमत्वाचे नाहीत. त्यांचा जन्म हा देशाचा उद्धार करण्यासाठी झाला आहे.

कंगनानं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मला माहिती आहे मी जे बोलले आहे त्यामुळे माझ्यावर खूप टीका होईल. लोकं मला नावं ठेवतील. ट्रोल करतील. पण मला त्याचा काहीही फरक पडणार नाही. मी त्याचा विचार करणार नाही. जी लोकं सत्याच्यासोबत आहेत त्यांना कुणाचीही भीती नाही. माझं बोलणं अशा लोकांसाठी मलमपट्टी किंवा औषधासारखं काम करेल. असेही कंगनानं म्हटले आहे.

Tejas Actress Kangana Ranaut Feels PM Narendra Modi
Shah Rukh Khan Birthday: जग फिरणारा शाहरुख आजवर काश्मिरला का नाही गेला? कारण ऐकून व्हाल भावुक

जेव्हा कृष्णाच्या विरोधात बोललं गेलं तेव्हा त्याचा मित्र सुदामा धावून आला. त्यानं त्याच्याविषयी सांगितलं. तो देव आहे. असे सुदामा म्हणाला होता. तेव्हा दुर्योधनानं आक्षेप घेत कृष्णाविषयी अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर काय घडलं हे आपल्याला माहिती आहे. अशा शब्दांत कंगनानं तिची प्रतिक्रिया दिली अलून अमर उजालानं या विषयी सविस्तर माहिती देणारे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com