esakal | कंगना रनौतची मुक्ताफळं, उर्मिला मातोंडकरला म्हणाली 'सॉफ्ट पॉर्न स्टार'
sakal

बोलून बातमी शोधा

kangna on urmila

कंगना आणि उर्मिला यांच्यातील वाद जास्त पेटला जेव्हा एका मुलाखतीत उर्मिलाला कंगनाने सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री म्हटलं.सोशल मिडियावर कंगनाच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

कंगना रनौतची मुक्ताफळं, उर्मिला मातोंडकरला म्हणाली 'सॉफ्ट पॉर्न स्टार'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणामुळे उघडकिस आलेलं ड्रग प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी रवि किशन आणि कंगना यांच्यावर निशाणा साधत म्हटलं होतं की 'कुछ लोग जिस खाली मै खाते है उसी मै छेद करते है.' जया बच्चन यांना सिनेसृष्टीतून अनेकजणांचा पाठिंबा मिळत आहे. असंच काहीसं उर्मिला मातोंडकरने केलं आणि मग कंगना आणि उर्मिला यांच्या वादाला तोडं फुटलं.

हे ही वाचा:  कंगना-जया बच्चन वादावर अमिताभ यांचं ट्विट, सोशल मिडियावर होतेय बिग बींच्या 'या' ट्विट्सची चर्चा  

कंगना आणि उर्मिला यांच्यातील वाद जास्त पेटला जेव्हा एका मुलाखतीत उर्मिलाला कंगनाने सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री म्हटलं. सोशल मिडियावर या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांनी कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं तर काहीजण कंगनाला सन्मानाने बोलायला शिकवत आहे. कंगनाने म्हटलं, 'मला स्वतःवर विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यासोबत समझौता केला नाही. माझ्यावर जो काही दबाव टाकला गेला त्याला मी बळी पडली नाही. मला तिकीटासाठी जास्त काम करावं लागलं नाही. ती माझ्या संघर्षाची मस्करी करत आहेत. ती स्वतः एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. ती स्वतःच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. '

त्याचं झालं असं की उर्मिलाने जया बच्चन यांना पाठिंबा देत कंगनाला म्हटलं होतं की 'अशा प्रकारच्या राजकिय वादात उडी मारुन कंगनाला भाजपाचं तिकीट हवं आहे. ' त्यानंतर उर्मिलाने एका मुलाखतीत 'हिमाचलला ड्रग्सचा गड म्हटलं आहे. कंगनाला सगळ्यात आधी स्वतःच्या राज्यापासून सुरुवात करायला हवी.' असं देखील तिने म्हटलं होतं त्यामुळे दोघांमध्ये वादाची ठिणगी उडाली.   

kangana ranaut called urmila matondkar soft porn star  

loading image
go to top