'धाकड' फ्लॉप झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली,'अजूनही..'

बॉक्सऑफिसवर कंगना रनौतच्या 'धाकड' सिनेमाला प्रदर्शाच्या पहिल्या दिवशीच केवळ १ करोड कमावता आले होते,त्यानंतर शो कॅन्सल करण्याची वेळही आली होती.
Kangana ranaut
Kangana ranautInstagram

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतचा(Kangana ranaut) 'धाकड;(Dhaakad) सिनेमा आला कधी आणि गेला कधी हे कळलंच नाही. प्रदर्शनाआधी या अॅक्शन स्पाय थ्रीलरची इतकी चर्चा रंगली होती की बॉक्सऑफिसवर कंगनाच्या अभिनयाची जादू काम करेल असं वाटत होतं. पण सिनेमा मात्र सपशेल आपटला. यानंतर कंगनाची अनेकांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. आता कंगनानं यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं आहे. 'धाकड' च्या अपयशासाठी दुसरी कितीतरी कारणं आहेत याविषयी तिनं सांगितलं आहे.

Kangana ranaut
'रंजना सारखं कुणीच नाही'; अशोक सराफ डोकावले भूतकाळात...

कंगनानं आपल्या सोशल मीडियावरील स्टोरीत एक आर्टिकल शेअर केलं होतं ज्याचं नाव होतं 'भारत की बॉक्सऑफिस की क्वीन'. तिनं लिहिलं होतं, ''२०१९ मध्ये मी 'मणिकर्णिका' सिनेमा केला जो १६० करोड कमावत सुपरहिटच्या रांगेत जाऊन बसला. २०२० वर्ष कोरोनानं पछाडलं होतं. २०२१ मध्ये मी माझ्या संबंध करिअरमधला सगळ्यात मोठा हीट ठरलेला 'थलाइवी' सिनेमा केला,जो ओटीटावर प्रदर्शित झाला होता आणि त्याला खूप चांगला रीस्पॉन्स मिळाला''. कंगनानं पुढं त्या आर्टिकलमध्ये लिहिलंय,''मी खूप नकारात्मक गोष्टी सहन केल्या, पण २०२२ मध्ये 'लॉकअप' या ब्लॉकबस्टर ठरलेल्या शो चं होस्टिंग मी करुन दाखवलं. आता वर्ष अजून संपलेलं नाही,खूप आशा आहेत''.

Kangana ranaut
Exclusive: 'माझी होणारी 'सौ' अशीच हवी'; कार्तिकनं जाहिर केली गुणांची यादी

कंगना व्यरिक्त 'धाकड' सिनेमात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रजनीश घई दिग्दर्शित 'धाकड'नं बॉक्सऑफिसवर काहीच कमाल दाखवली नाही. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी फक्त एक करोडचा बिझनेस या सिनेमानं केला. यानंतर सिनेमाची अशी अवस्था झाली की काही सिनेमागृहातून याचे शो कॅन्सल केले गेले.

Kangana ranaut
सिनेमाच्या सेटवर 'या' स्टार्सचे प्राण जाता-जाता वाचलेयत,नेमकं काय घडलेलं?

कंगनाच्या येणाऱ्या काही सिनेमां विषयी बोलायचं झालं तर ती लवकरच 'तेजस' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कंगनानं फायटर पायलटची भूमिका केली आहे. 'इमर्जेंसी' या सिनेमातही कंगना दिसणार आहे. या सिनेमात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा ती साकारत आहे. तसंच,कंगनानं 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता- द इनकार्नेशन' या सिनेमांची देखील घोषणा केली आहे. तसंच,नवाजुद्दिन सिद्दीकी आणि अवनित कौर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाची निर्मिती तिनं केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com