चार माणसांत कंगनाने काढले हृतिकच्या अभिनयाचे वाभाडे..म्हणाली, 'तो तर..'Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut & Hrithik Roshan

Kangana Ranaut: चार माणसांत कंगनाने काढले हृतिकच्या अभिनयाचे वाभाडे..म्हणाली, 'तो तर..'

Kangana Ranaut: बॉलीवूडची 'धाकड' अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली पहायला मिळते. त्यामुळे अनेकजण तिच्यावर ट्रोलिंगचा निशाणा साधतात. ती कुठलाही राजकीय मुद्दा असो किंवा सामाजिक मुद्दा कोणत्याही मुद्द्यावर बिनधास्त आपलं मत व्यक्त करते.

काही दिवसांपूर्वीच ट्वीटरवर कंगनानं चाहत्यांसाठी एक प्रश्नोत्तरांचे सेशन ठेवले होते, ज्यामध्ये चाहत्यांना तिला कोणतेही प्रश्न विचारायची मुभा तिनं दिली होती. कंगनानेही त्या सेशनमध्ये बिनधास्त उत्तरं द्यायला सुरुवात केली तेवढ्यात एका चाहत्यानं कंगनाला हृतिकविषयी एक प्रश्न विचारला. ज्यावर अभिनेत्रीनं हृतिकची जोरदार खिल्ली उडवली. चला जाणून घेऊया काय होता चाहत्याचा प्रश्न.

Ask Kangana सेशन दरम्यान कंगनाला ट्वीटरवर चाहते एकामागून एक प्रश्न विचारत होते. त्या दरम्यान एकानं कंगनाला विचारलं की,'तुझा आवडता अभिनेता कोणता?' बरं,चाहत्यानं तिला ऑप्शनही दिले ..ज्यात हृतिक रोशन आणि दिलजीत दोसांज ही नावं होती.

ज्यावर कंगनानं दिलेलं उत्तर आता जोरदार व्हायरल होत आहे.(Kangana Ranaut in ask kangana session comment on hrithik acting in front of her fans)

कंगनानं नेटकऱ्याच्या त्या प्रश्नाला उत्तर देत म्हटलं की, ''मला वाटतं,कोण अॅक्शन करतं तर कोण सॉन्ग व्हिडीओ बनवतो...खरं सांगू का यापैकी कोणाला मी अॅक्टिंग करताना नाही पाहिलं..जर कधी मी त्यांना अॅक्टिंग करताना पाहिलं तर मी सांगू शकेन..आणि तसं त्यांनी केलं तर मला सांगा...''

आता कंगनाच्या या उत्तरानं सोशल मीडियावर काय सुरु असेल हे वेगळं सांगायला नकोच..तिच्या उत्तराच्या ट्वीटवर फक्त कमेंट्स वाचल्यात तरी परिस्थितीचा अंदाज येईल आपल्याला.

बोललं जातं की कंगना आणि हृतिकमधलं भांडण खूप जुनं आहे. 'क्रिश' सिनेमाच्या दरम्यान दोघांचे अफेअर सुरू झाले होते. कंगनाच्या मते,हृतिकनं तिला वचन दिलं होतं की तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल.

कंगनानं दावा केला होता की हृतिकनं तिला अंधारात ठेवलं,तिचा विश्वासघात करुन तिच्याशी ब्रेकअप केलं.

तर दुसरीकडे,हृतिकनं आजपर्यंत या प्रकरणावर कोणतीही रिअॅक्शन दिलेली नाही.