राष्ट्रपतींना देवीची उपमा, द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीनंतर कंगनाची पोस्ट..

नुकतीच अभिनेत्री कंगना रणौत हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
Kangana Ranaut meets President Droupadi Murmu, writes, 'Sitting on that throne she looks nothing short of a goddess'
Kangana Ranaut meets President Droupadi Murmu, writes, 'Sitting on that throne she looks nothing short of a goddess'sakal
Updated on

kangana ranaut : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. म्हणजे कंगना काही बोलली आणि त्यावर खळबळ उठली नाही असे क्वचितच होते. कंगना आणि केंद्र सरकार यांचे एक वेगळेच समीकरण आहे. भाजप सरकारला दिलेला उघड पाठिंबा असो किंवा हिंदुत्वाची भूमिका, ती कायमच राजकीय परिघातही चर्चेत असते. 'राष्ट्रपती'पदी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू जेव्हा विराजमान झाल्या तेव्हाही कंगनाने भरभरून कौतुक केले होते. नुकतीच त्याने राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीनंतर कंगनाने एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तिने द्रौपदी मुर्मू यांना साक्षात देवीची उपमा दिली आहे. (Kangana Ranaut meets President Droupadi Murmu, writes, 'Sitting on that throne she looks nothing short of a goddess')

भारताच्या राष्ट्रपती पदी काही दिवासांपूर्वी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची निवड करण्यात आली. देशात आदिवासी समाजाला मिळालेला हा सर्वोच्चसन्मान असल्याने सर्व स्तरातून याचे कौतुक झाले. अभिनेत्री कंगनाने देखील त्यावेळी 'हा नारी शक्तीचा विजय आहे' असे म्हंटले होते. आता कंगना थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला गेली होती. या भेटीमध्ये कंगना भारावून गेली. याबाबत सविस्तर पोस्ट कंगनाने लिहिली आहे.

या पोस्ट मध्ये कंगना म्हणते, 'माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांना भेटून अत्यंत आनंद झाला. त्यांना भेटता येणं ही मोठी सन्मानाची बाब आहे. त्यांचा सौम्य आवाज, शांत स्वभाव आणि नजरेतील करुणा हे एखाद्या वेगळ्या विश्वाचा अनुभव देणारे होते. त्या खुर्चीवर त्यांना बसलेलं पाहणं म्हणजे एखाद्या देवीला पाहण्यासारखं आहे. जी आपलं पालनपोषण करते, काळजी करते, मार्गदर्शन करते.. या भेटीत राष्ट्रपतींनी माझ्या कामाचे आवर्जून कौतुक केले. त्यानंतर मीही त्यांना सांगितले की, जय दिवशी त्या देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचल्या तेव्हा असे वाटले जगातील कोणतीही स्त्री आपल्या सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकते. मी त्यांची खूप आभारी आहे कारण त्यांनी त्यांची ती नजर, त्यांचंते पाहणं अजूनही मला खूप आनंद देऊन गेलं. जय हिंद', असे कंगनाने लिहिले आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com