शुटींगमधून ब्रेक घेत संजय दत्तला भेटण्यासाठी पोहोचली कंगना रनौत

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 27 November 2020

कंगनाने सोशल मिडियावर संजय दत्तसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थने केली आहे. 

मुंबई- अभिनेत्री कंगना रनौत आगामी सिनेमा थलाईवाच्या शेवटच्या शुटिंग शेड्युलनंतर हैदराबादमध्ये आहे. याचदरम्यान तिची भेट अभिनेता संजय दत्तसोबत झाली. कंगनाने सोशल मिडियावर संजय दत्तसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थने केली आहे. 

हे ही वाचा: 'मिर्झापूर'चा रॉबीन गर्लफ्रेंडसोबत अडकला विवाहबंधनात, पाहा लग्नसोहळ्याचे फोटो  

कंगनाने संजुबाबा सोबतचा फोटो शेअ करत लिहिलंय, ''जेव्हा मला कळालं की आम्ही हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये थांबलो आहोत तेव्हा मी आज सकाळी संजू सर यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी गेले. आणि माझ्यासाठी आनंददायक आश्चर्य म्हणजे संजूबाबाला पाहिल्यावर तो पहिल्यापेक्षा जास्त हँडसम आणि हेल्दी वाटत आहे. आम्ही तुमच्या दीर्षायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत.''

संजय दत्तला कॅन्सर झाला होता. ११ ऑगस्टला त्याने स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर २१ ऑक्टोबरला ट्विट करत त्याने सांगितलं की तो कॅन्सरसोबतची लढाई जिंकला आहे. त्याने हे ट्विट करत सांगताना त्याच्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे आणि चाहत्यांचे आभार मानले होते जे त्याच्या या कठीण काळात त्याच्यासोबत होते.  

कंगनाच्या प्रोजेक्टविषयी बोलायचं झालं तर थलायवी सिनेमात ती मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये ती तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा हिंदीसोबतंच तमिळ आणि तेलुगु भाषेमध्ये रिलीज होईल.   

kangana ranaut met sanjay dutt in hydrabad pray for his good health  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut met sanjay dutt in hydrabad pray for his good health