Kangana Ranaut: 'तिखट' कंगनाकडून माधुरीचं 'गोड' कौतूक, ती म्हणजे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actress Kangana Ranaut News:

Kangana Ranaut: 'तिखट' कंगनाकडून माधुरीचं 'गोड' कौतूक, ती म्हणजे...

Bollywood Actress Kangana Ranaut News: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात असणारी कंगना स्वताला बॉलीवूडची क्वीन म्हणवते. यापूर्वी तिनं केलेल्या बेताल वक्तव्यानं मोठे वादही निर्माण झाले (bollywood News) आहेत. मनोरंजन विश्व सोडून मध्येच राजकीय भूमिका घेत वेगवेगळी वक्तव्य केल्यानं कंगनाच्या चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली (Entertainment News) होती. विशेषत: दिल्लीत शेतकऱ्यांचे जे आंदोलन होते त्यावेळी तिनं शेतकऱ्यांचा अवमान करणारी विधानं केली होती. एका मुलाखतीत तर देशाच्या स्वातंत्र्यावरुन केलेलं वक्तव्य तर तिला चांगलचं भोवलं होतं. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

कंगना सहजासहजी कुणाचं कौतूक करत नाही. असं म्हटलं जातं. बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्यांना ती बॉलीवूड माफिया असे म्हणते. नुकतचं तिनं प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर केलेली धार्मिक टिप्पणी वादाचे कारण झाली होती. त्यामुळे कंगना कधी काय बोलेल याचा भरवसा नाही. आता तिनं बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं कौतूक केलं आहे. इंस्टावर तिच्याबद्दल खास पोस्ट शेयर करुन माधुरीविषयीच्या भावना तिनं व्यक्त केल्या आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

Bollywood Actress Kangana Ranaut News:

Bollywood Actress Kangana Ranaut News:

कंगनानं माधुरीच्या हम आपके है कौन या प्रसिद्ध चित्रपटातील त्याच नावाचं थीम साँग आणि माधुरीचा फोटो शेयर केला आहे. माधुरीचं कौतूक करण्याची कंगनाची काही पहिलीच वेळ नाही. तिनं यापूर्वी देखील तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या वर्षी देखील तिनं माधुरीचं हम आपके है कौन मधील दीदी तेरा देवर दिवाना नावाचं गाणं शेयर केलं होतं. त्यावर विंटेज बॉलीवूड असं म्हटलं होतं. कंगनाच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या.

हेही वाचा: मुळा -मुठा नदी संवर्धन नेमकं कुठे अडलंय?

आता शेयर केलेल्या व्हिडिओबद्दल ती लिहिते की... रात्रीची शिफ्ट संपवून आली आहे. आणि माझ्या टाईमलाईनवर एक फोटो शेयर करते आहे. माधुरी लिजंड..... अशा शब्दांत तिनं माधुरीचं कौतूक केलं आहे. कंगनाच्या बाबत सांगायचे झाल्यास, फार कमीवेळा असे झाले आहे की, कंगनानं बॉलीवूडमधील एखाद्या सेलिब्रेटीचं मनापासून कौतूक केलं आहे. ती सतत कुणावर टीका करताना दिसते. तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती सध्या इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित इमर्जन्सी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

हेही वाचा: संतांच्या वाङ्मयात प्रकटलेला गणेश....

Web Title: Kangana Ranaut Praise Madhuri Dixit Legend Share Hum Aapke Hain Koun Song

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..