Kangana Ranaut: अरेच्चा कंगना कौतूकही करते! 'या'अभिनेत्रीसाठी पोस्ट शेअर करत म्हणाली, 'चुपचाप चित्रपट..'

Kangana Ranaut And Yami Gautam:
Kangana Ranaut And Yami Gautam:Esakal

कंगना रणौत हे मनोरंजन विश्वातलं असं नाव आहे जे कायम चर्चेत असतं. कंगना ही नेहमीच अनेक विषयावर तिचं परखड मत व्यक्त करत असते. मग ते राजकारण असो किंवा मनोरजंन विश्व. सध्या ती करण जोहरवर चांगलाच निशाणा साधतांना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि त्यांनतर अनुष्का यांच्यामुळे कंगनानं करण जोहरला चाचा चौधरी म्हटलं. तिच्या या स्टोरीची बरिच चर्चा रंगली. ती अनेक कलाकरांवर निशाणा साधत असते. मात्र कंगना नेहमीच सर्वाबद्दल वाईटचं लिहित नाही तर कधी काही कलाकारांचं कौतुकही करते.

Kangana Ranaut And Yami Gautam:
Madhuri Dixit: 'गुड फ्रायडे' च्या शुभेच्छा देऊन फसला माधुरीचा नवरा...नेटकऱ्यांनी भरवली शाळा

खूप कमी लोक कंगनाला त्यांच्या कामाने प्रभावित करू शकतात. असचं काहीस अभिनेत्री यामी गौतमने केलं आहे. यामी सध्या तिच्या 'चोर निकल के भागा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे.

यामीचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना खुप आवडत आहे. त्यामुळे कंगनाही यामीच्या कामाची फॅन झाली आहे आणि तिचे कौतुक करताना थकत नाही आहे.

Kangana Ranaut And Yami Gautam:
Shreyas Talpade: 'अब रुल पुष्पा का…', श्रेयस तळपदेची अल्लू अर्जूनसाठी खास पोस्ट व्हायरल..

यामीनं एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिचा चित्रपट 'चोर निकल के भागा' हा जागतिक स्तरावर नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

असं तिनं सांगितलं. पोस्ट शेअर करताना, यामी गौतमने कॅप्शन दिले, ' #ChorNikalKeBhaga जगभरातील रेकॉर्ड तोडत आहे आणि सीमा ओलांडत आहे!' यामीची ही पोस्ट चर्चेत आली आणि व्हायरल झाली.

Kangana Ranaut And Yami Gautam:
Kangana Ranaut And Yami Gautam:

त्यानंतर कंगना राणौतने यामीची ही पोस्ट पाहिल्यानंतर यामीचं कौतुक केलं. यामीची पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत कंगना रणौतने लिहिले की, 'यामी गौतम खूप चांगलं काम करत आहे, सतत आणि गुपचूप सर्वात यशस्वी चित्रपट देत आहे, खूप प्रेरणादायी आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन.' ,कंगनाने या पोस्टसोबत हार्ट शेप इमोजीही टाकले आहे.

त्यांनतर यामीने तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये कंगनाला Thanks आणि kind सांगितले.

Kangana Ranaut And Yami Gautam:
Shah Rukh Khan: शाहरुख पुन्हा ठरला 'बादशाह'! लियोनेल मेसी-मार्क जुकरबर्ग यांना मागे टाकत बनवला नवा रेकॉर्ड

यामी गौतमचा चित्रपट 'चोर निकल के भागा' 24 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने ओटीटीवरील ब्लॉकबस्टर चित्रपट आरआरआरलाही मागे टाकले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय सिंग आहेत. यामीशिवाय सनी कौशल आणि शरद केळकर यांच्या पात्रांनाही चित्रपटात भरभरून प्रेम मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com