esakal | कंगनाने रिया चक्रवर्तीवर तिच्या वकिलांबाबत उपस्थित केले प्रश्न, 'जर निर्दोष आहेस तर..'
sakal

बोलून बातमी शोधा

kangana on rhea chakraborty

कंगनाने मिडियाशी चर्चा करताना अनेक सेलिब्रिटींवरही निशाणा साधत आहे. तसंच सुशांत प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक प्रश्नांचा भडिमार केला आहे

कंगनाने रिया चक्रवर्तीवर तिच्या वकिलांबाबत उपस्थित केले प्रश्न, 'जर निर्दोष आहेस तर..'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौट अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात स्वतःहून पुढे येऊन न्यायाची मागणी करत आहे. ती सोशल मिडियावर दिवंगत अभिनेता सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आवाहन करत आहे. सोबतंच मिडियाशी चर्चा करताना अनेक सेलिब्रिटींवरही निशाणा साधत आहे. यावेळी कंगनाने सुशांत प्रकरणात अडकलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक प्रश्नांचा भडिमार केला आहे

हे ही वाचा: प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनीलची आत्महत्या, बाथटबमध्ये सापडला मृतदेह 

रिया सुशांतची गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या मृत्युनंतर त्याच्या वडिलांनी तिच्यावर एफआयआर दाखल केली होती. याप्रकरणा विरोधात रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती ती न्यायालयाने फेटाळून लावली. अशांतच कंगनाने रिया चक्रवर्तीने केलेल्या महागड्या वकिलांवर आणि सीबीआय तपास होऊ नये या तिच्या म्हणण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कंगनाने नुकतंच एका वृत्तवाहिनील्या दिलेल्या मुलाखतीत हे प्रश्न विचारले आहेत. तिने म्हटलंय, 'जर तिला वाटतंय की ती निर्दोष आहे तर तिने असा क्रिमिनल वकील का निवडला ज्याची गणती महागड्या वकिलांमध्ये केली जाते.' याशिवाय कंगनाने रिया आणि बॉलीवूड सेलिब्रिटींवरही टीका केली आहे. कंगनाने आमिर खान आणि अनुष्का शर्मावर तिचा राग व्यक्त केला आहे. ती म्हणाली सिने इंडस्ट्रीत कोणीच सुशांतसाठी सीबीआय तपासाची मागणी केली नाही. आमीर खान आणि अनुष्का शर्माने देखील नाही ज्यांनी सुशांतसोबत पीके सिनेमात केलं होतं.

कंगनाने आदीत्य चोप्रा आणि राणीमुखर्जीवरही निशाणा साधत म्हटलंय की 'तुमच्या इंडस्ट्रीतील तुमच्या सहका-याचा मृत्यु होतो आणि तुमच्याकडे त्याच्यासाठी बोलायला शब्द नाहीत?'  

kangana ranaut questions how and why rhea chakraborty hired a big lawyer within a day  

loading image
go to top