मी श्रीरामाची भक्त,माझ्या बोलण्याचा विपर्यास नको; पद्मश्री परत करण्यावर  कंगना बोलली

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 8 October 2020

#KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग नंबर ट्रेण्ड होताना दिसत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे कंगणाने केलेले विधान. ”सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सिद्ध करु शकले नाही, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन”, असे ती म्हणाली होती. जुलै महिन्यामध्ये तिने हे वक्तव्य केलं होतं.

मुंबई - आपण जे बोललो त्याचा वेगळाच अर्थ घेऊन त्याविषयी चर्चा सुरु करण्यात आली आहे. इतरांनी मी काही बोलले त्याचा विपर्यास करण्याची गरज नाही. मी श्रीरामाची भक्त आहे. माझ्या विधानांची खात्री करुन घेण्यासाठी आरोप करणा-यांनी ती मुलाखत पुन्हा एकदा पाहावी या शब्दांत अभिनेत्री कंगणाने टीकाकारांना उत्तर दिले आहे.

#KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग नंबर ट्रेण्ड होताना दिसत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे कंगणाने केलेले विधान.  ”सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सिद्ध करु शकले नाही, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन”, असे ती म्हणाली होती.   जुलै महिन्यामध्ये तिने हे वक्तव्य केलं होतं. मात्र, एम्स रुग्णालयाकडून आलेल्या रिपोर्टनंतर सोशल मीडियावर सेलिब्रिटींसह अनेकांनी तिच्याकडे पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. परंतु, या सगळ्यावर कंगनाने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ती म्हणाली, “स्मरणशक्ती कमी असेल तर ही मुलाखत परत पाहा. जर मी कोणतेही चुकीचे किंवा खोटे आरोप लावले असतील तर माझे सगळे पुरस्कार परत करेन. हे एका क्षत्रिय व्यक्तीचं वचन आहे. मी श्रीरामाची भक्त आहे. प्राण जाए पर वचन न जाए. जय श्री राम”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. याशिवाय तिने त्याच मुलाखतीची लिंक शेअर केली आहे.

‘अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असं सांगणारा रिपोर्ट एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांवर निशाणा साधला होता. तसेच सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याचे तिने म्हटले होते. . एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं. 

तर मग माझे चित्रपट पाहू नका; पुरुषी मानसिकतेवर मलिका शेरावतची टीका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut Says I Will Return It If I Said Anything Wrong