कंगनाची बहिण मोदींना म्हणतेय, 'मौका दो'!

वृत्तसंस्था
Wednesday, 4 March 2020

अभिनेत्री कंगना राणावतची बहिण रंगोली चांडेलने मोदींकडे एक हटके मागणी केली आहे. काय आहे ही मागणी?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत सोशल मीडिया सोडणार असे सांगून देशवासियांना भ्रमात टाकले. एक दिवस चर्चा झाल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला की ८ मार्च म्हणजेच महिलादिनी मोदी सर्व महिलांना आपले सोशल मीडिया चालवायला देणार. यानंतर अभिनेत्री कंगना राणावतची बहिण रंगोली चांडेलने मोदींकडे एक हटके मागणी केली आहे. काय आहे ही मागणी?

मोदींनी घेतला मोठा निर्णय; यंदा होळीच्या कार्यक्रमात...

दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी मोदींनी आपले सर्व सोशल मीडिया अकाऊंट महिलांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मोदींना सोशल मीडिया सोडणार अशा आशयाचे ट्विट केले होते, या ट्विटने खळबळ उडाली. मात्र, काल त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, देशातील आदर्श महिलांमुळे ते प्रेरित आहेत अशा महिलांना मी महिलादिनी माझे सोशल मीडिया अकाऊंट वापरायला देणार आहे. या ट्विटवर असंख्य रिप्लाय आले आहेत. अनेक महिलांनी मोदींचे अकाऊंट हँडल करण्याची इच्छा दर्शवली आहे. यातच भर म्हणून कंगना राणावतची बहिण रंगोली हिनेही ट्विट करत प्लीज मला आपलं अकाऊंट चालवायला द्या असे ट्विट केले आहे.

 

रंगोली आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, 'मोदीजी प्लीज मी प्लीज मी, आपके आलोचकोंन को कुछ खरी खोटी सुनाने का मन है प्लीज मौका दो..' तिने हे खोचक ट्विट केले असले तरी तिला मोदींचे ट्विटर हँडल चालवायची इच्छ आहे. या दिवशी तिला मोदींचे अकाऊंट चालवून त्यांच्या समर्थकांना खरं-खोटं सुनवायचं आहे. कंगनाच्या बहिणीने हे ट्विट केल्याने ते व्हायरल होत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut sister Rangoli ask to PM Modi for handling social media accounts