'मुस्लीम मुलाशी प्रेमसंबंधामुळे ह्रतिकच्या बहिणीचा कुटुंबियांकडूनच छळ!'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 June 2019

'मुस्लीम मुलाशी सुनैनाचे प्रेमसंबंध असल्याने तिच्या कुटुंबियांकडूनच तिला मारहाण केली जात असल्याचा' आरोप अभिनेत्री कंगना राणावतची बहिण रंगोली चंदेलने केला आहे.

कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यातील वाद जुना आहे. पण तरी अधूनमधून या वादाला नवी कलाटणी मिळत असते. या वादात आता ह्रतिकची बहिण सुनैना रोशनचे नावही पुढे आले आहे. 'मुस्लीम मुलाशी सुनैनाचे प्रेमसंबंध असल्याने तिच्या कुटुंबियांकडूनच तिला मारहाण केली जात असल्याचा' आरोप अभिनेत्री कंगना राणावतची बहिण रंगोली चंदेलने केला आहे.

 

रंगोलीने ट्विट करत संपूर्ण घटनेची माहिती दिली. 'सुनैना ही सारखी कंगनाला फोन करुन मदतीची विनवणी करत आहे. दिल्लीतील एका मुस्लीम मुलाशी सुनैनाचे प्रेमसंबंध आहेत, त्यामुळे रोशन कुटुंबीय तिला त्रास देत आहे. गेल्या आठवड्यात एका महिला पोलिसाने तिला मारहाण केली. तिच्या वडिलांनीही तिच्यावर हात उचलला. तिचा भाऊ तिला बंदिस्त करुन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सुनैना रडत कंगनाला मदतीसाठी फोन करत आहे. कंगनाला तिची मदत तरी कशी करावी हे सूचत नाहीये. कंगनाने तिचा नंबर ब्लॉक केला आहे, पण आम्हाला तिच्या सुरक्षिततेची काळजी वाटते आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे. मला आशा आहे कि निदान माझ्या ट्विटनंतर तरी तिचे कुटुंबिय तिला त्रास देणं बंद करतील आणि तिचे प्रेम स्वीकारतील. सुनैनाचे सगळे मॅसेज आणि कॉल मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत.' 

 

 

 

 

सुनैनाने आज सकाळीच एक ट्विट केले आहे. ज्यात तिने कंगनाला तिचा पाठींबा असल्याचे म्हटले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून ह्रतिकची बहिण सुनैना डिप्रेशनमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. सुनैनाने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय कुटुंबाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा खुलासाही तिने केला आहे. त्यानंतर कुटुंबियांसोबत वादाच्या चर्चाही होत होत्या. रोशन कुटुंबाकडून अद्याप या सर्व विषयावर कुठलाही खुलासा झालेला नाही. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kangana ranaut sister reveals about hrithik roshans family is assaulting sunaina roshan