जिस दिन मै जाऊंगी, तुमको साथ लेकर जाऊंगी; कंगनाची ट्विटरला धमकी

kangana
kangana

नवी दिल्ली- क्रिकेटर रोहित शर्मासंबंधी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतने केलेले ट्विट हटवण्यात आले आहेत. ट्विटरच्या या कारवाईवर भडकलेल्या कंगना राणावत आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगपाखड केली असून ट्विटरला चीनच्या हातातील बाहुले ठरवून टाकले आहे. रोहित शर्माने एक ट्विट करत म्हटलं होतं की, ''भारत जेव्हा केव्हा एकत्र उभा राहिलाय, तेव्हा तो अधिक मजबूत झाला आहे. आपले शेतकरी देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मला आशा आहे की त्यांचे समाधान करण्यासाठी प्रत्येकजण आपली भूमिका बजावेल''

fact check: रिहाना खरंच पाकिस्तानची हस्तक आहे का? जाणून घ्या फोटोमागचं सत्य

रोहित शर्माच्या या ट्विटवर उत्तर देताना कंगनाने क्रिकेटरवर हल्लाबोल केला होता. एवढंच नाही तर तिने टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख केला. त्यानंतर कारवाई करत ट्विटरने तिचे ट्विट हटवले आहेत. ट्विटरच्या या कारवाईमुळे कंगनाने आगपाखड केली आहे. तिने थेट ट्विटरलाच धारेवर धरले. चीनचे बाहुले असणारे ट्विटर माझे अकाऊंट सस्पेंड करण्याचा इशारा देत आहे. मी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. लक्षात ठेवा जेव्हा मी जाईल, तुम्हीपण जाल. जसं चिनी टिकटॉक बॅन झालं, तसं तुमच्यावरही बॅन लागेल.  

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये ट्विटरचे सीईओ जॅक दोर्जी यांना टॅग केले आहे. कंगनाचे ट्विट हटवण्याप्रकरणी ट्विटरच्या एका प्रवक्त्याने म्हटलं की, निर्धारित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंगना राणावतच्या अकाऊंटवर अॅक्शन घेण्यात आली आहे. याआधी जानेवारी महिन्यात कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. त्यावेळी कंगनाने तांडव वेब सीरिज प्रकरणी म्हटलं होतं की, भगवान कृष्णानेही शिशुपालच्या 99 चुकांना माफी दिली होती. अगोदर शांती आणि नंतर क्रांती..आता त्यांचे डोके कापण्याची वेळ आली आहे..जय श्री कृष्ण.

कृषी कायद्यांमध्ये काळं काय आहे? मला शेतकऱ्यांनी पटवून द्यावं- कृषीमंत्री

दरम्यान, कृषी आंदोलनाप्रकरणी कंगनाने अनेक वादग्रस्त ट्विट केले आहेत. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात ट्विट केलं होतं. त्यानंतर कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी असल्याचं म्हटलं होतं. तसेच ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे समर्थन केले अशा लोकांनाही तिने दहशतवादी ठरवलं होतं. कंगनाने अनेक मुद्द्यांवर स्वत:हून उडी घेत आपली क्षोभक प्रतिक्रिया दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com