esakal | कंगनाला टिव-टिव भोवली; ट्विटर अकाऊंट केलं सस्पेंड

बोलून बातमी शोधा

kangana ranaut
कंगनाला टिव-टिव भोवली; ट्विटर अकाऊंट केलं सस्पेंड
sakal_logo
By
स्वाती वेमूल

सतत वादग्रस्त विधान करत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत Kangana Ranaut हिचं ट्विटर अकाऊंट Twitter सस्पेंड करण्यात आलं आहे. ट्विटरच्या नियमांविरुद्ध मजकूर पोस्ट केल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल कंगनाने ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर कंगनाचं ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आलं आहे. (Kangana Ranaut Twitter account suspended for violating rules)

कंगनाने तृणमूल काँग्रेस पार्टी आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ट्विट केलं होतं. तिने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला होता. ज्यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या महिलांना मारहाण केली जात होती. कंगना सतत तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. याआधीही तिच्यावर आणि तिची बहीण रंगोली चांडेल यांच्यावर ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याच आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा : 'ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावा'; नेटकऱ्यांनी कंगनाला काढलं मूर्खात

img

कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न आहे, तसंच ती हिंदु-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. वांद्रे कोर्टात तिच्याविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने मुंबई पोलिसांना कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.