Kangana Ranaut: विराट-अनुष्काच्या वमिकाचं नाव घेत आता का चिडलीय कंगना रनौत; जाणून घ्या प्रकरण...

आयपीएल मॅचेसच्या दरम्यान कंगनाला काहितरी दिसलं आणि अभिनेत्रीनं ट्वीट करत तिखट वक्तव्य केलं आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Esakal

Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यावर बिनधास्त मत व्यक्त करताना दिसते. समाजात होणाऱ्या घटनांवर व्यक्त होताना ती सामाजिक मुद्द्यांवर देखील आपली नजर ठेवून असते. आता कंगना आयपीएल पाहते की नाही माहित नाही पण तिच्या नजरेला त्यातलं काहीतरी खटकलं तर तिनं त्याच्यावरही प्रतिक्रिया देताना मागे पुढे पाहिलेलं नाही.

कंगना रनौतला नुकतंच आयपीएल क्रिकेट मॅचच्या दरम्यान एक पोस्टर दिसला जो विराट-अनुष्काची मुलगी वमिकाशी संबंधित होता. कंगनाला हा पोस्टर खटकला आणि तिनं यावरनं प्रतिक्रिया दिली.(Kangana Ranaut virat kohli anushka sharma kid ipl photo viral )

Kangana Ranaut
Kisi Ka Bhai kisi ki Jaan सिनेमा कुटुंबासोबत पहाल तर बिघडेल पूर्ण महिन्याचं बजेट.. एका तिकीटाची किंमत ऐकाल तर..

त्या प्रकरणाविषयी बोलायचं झालं रॉयल चॅलेंजर्स बेंगुळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स मॅच दरम्याम उपस्थित ऑडिन्समध्ये एक मुलगा होता ज्याच्या हातात एक प्लेकार्ड होतं. प्लेकार्डमध्ये मुलानं विराट कोहलीला विनंती केली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं की,'हाय विराट अंकल, मी वमिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?' आता हीच गोष्ट कंगनाला खटकली. तिला मुलाची ती विनंती अजिबात आवडली नाही.

तिनं ट्वीटरवर या पोस्टरचं विरोध करणाऱ्या एका व्यक्तीचं समर्थन केलं आहे आणि त्या प्लेकार्ड हातात पकडलेल्या मुलाच्या पालकांवर निशाणा साधला आहे. कंगना म्हणाली,''लहान मुलांना हे असं नको ते कशाला शिकवता. यामुळे तुम्ही मॉर्डन किंवा कूल सिद्ध होऊ शकत नाही तर अश्लील आणि फूल दिसता''.

कंगना रनौतनं थेट त्या मुलाला तर काही म्हटलं नाही पण त्याच्या पालकांची शाळा घेतली.

Kangana Ranaut
Shilpa Shetty: 'वाईनपेक्षाही तू...', चाहत्याला पडली शिल्पाची भुरळ..
Kangana Ranaut
Sonalee Kulkarni: 'मुळात तुझे फोटो इतके भारी येतातच कसे?'..

माहितीसाठी इथं सांगतो की आयपीएल मध्ये यावेळी देखील अनुष्का शर्मा आपला पती विराट कोहलीला पाठिंबा देताना दिसत आहे. विराटसाठी अनुष्का मॅचेस दरम्यान ग्राउंडवर उपस्थित दिसते. यावेळी विराट कोहलीच्या बॅटमधून तुफान रन्स निघत आहेत आणि तो सगळ्यात जास्त रन करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com