esakal | जावेद अख्तर मानहानी केस; 'बॉलीवूडची क्वीन' उच्च न्यायालयात
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut

जावेद अख्तर मानहानी केस; 'बॉलीवूडची क्वीन' उच्च न्यायालयात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडची क्वीन (bollywood queen) अशी ओळख असणाऱ्या कंगनावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मानहानीचा दावा ठोकला होता. त्यावरुन कंगनानं पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. तिनं याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईतील अंधेरी मेट्रोपॉलिटन (andheri metropolitan) कोर्टानं दिलेल्या आदेशाच्या विरोधात तिनं मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना आणि जावेद अख्तर यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वादाच्या केंद्रस्थानी कंगना होती. तिनं अपमानजनक शब्द वापल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला होता. (kangana ranaut vs javed akhtar queen actor moves bombay high court over defamation case yst88)

जावेद यांनी केलेल्या तक्रारीनुसार कंगनाला अटक करण्याचे आदेश होते. मात्र तिला मार्चमध्ये जामीन मिळाला. न्यायालयानं अनेकदा सुचना देऊनही ती न्यायालयात हजर न झाल्यानं तिला न्यायालयानं तंबीही दिली होती. कंगनावर असा आरोप आहे की, तिनं जावेद अख्तर यांच्यावर विनाआधार काही वक्तव्ये केली आहे. त्यामुळे अख्तर यांची प्रतिमा मलीन झाली आहे. याप्रकरणात न्यायालयानं तिला समन्स पाठवले होते. मात्र त्यावर कंगनानं कोणतेही उत्तर दिलेलं नाही. यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना न्यायालयानं दिले होते.

अख्तर यांनी आपले वकील निरंजन मुंदर्गी यांच्या मार्फत 2 नोव्हेंबर 2020 ला एक खासगी याचिका दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी इंडियन पीनल कोडच्या सेक्शन 499 आणि सेक्शन 500 च्यान्वये तिच्यावर आरोप करण्यात आले होते. अख्तर यांनी सांगितले होते की, मी एक स्वावलंबी व्यक्ती आहे. अभिनेता ह्रतिक रोशन प्रकरणात कंगनाने अख्तर यांच्यासंबंधित काही विधाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केली होती. या विधानांमध्ये तथ्य नसून त्यामुळे माझी बदनामी झाली आहे, असा आरोप अख्तर यांनी केला आहे.

हेही वाचा: Raj Kundra case: व्हायरल मीम्सवर गहना वशिष्ठ म्हणते, 'प्रत्येकजण फायदा घेतोय'

हेही वाचा: अविनाशने जोडले अनिरुद्ध पुढे हाथ; पाहा व्हिडिओ

4 ऑक्टोबर 1964 मध्ये 27 रुपये घेऊन मुंबईला आलो होतो. त्यावेळी माझ्याकडे काहीही नव्हतं. याचिकाकर्त्यानं आपल्या याचिकेत असे नमुद केले आहे की, आपण गेल्या 55 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहोत. अशावेळी आपल्यावर कऱण्यात आलेले आरोप कशाच्या जोरावर करण्यात आले आहेत, असा प्रश्न त्यात विचारण्यात आला आहे.

loading image