Mahadev Betting App Case: "आताच सुधरा नाहीतर...!",महादेव अ‍ॅप प्रकरणात अडकलेल्या बॉलिवूड कलाकारांवर कंगनाचा हल्ला

Kangana Ranaut On Celebs In Mahadev Betting App Case:
Kangana Ranaut On Celebs In Mahadev Betting App Case: Esakal

Kangana Ranaut On Celebs In Mahadev Betting App Case: महादेव अ‍ॅप हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकारदेखील ईडीच्या रडारवर आहेत. ज्यात रणबीर कपूर, कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान, अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाश्मी, बोमन इराणी, कॉमेडियन भारती सिंग आणि नेहा कक्कर यांचा समावेश आहे.

Kangana Ranaut On Celebs In Mahadev Betting App Case:
Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ठरली बिग बॉस 17 ची महागडी स्पर्धक? घेतलं इतक्या कोटीचं मानधन!

ईडीच्या म्हणण्यानुसार या स्टार्सनी या अ‍ॅप्सची जाहिरात केली आहे. त्यांच्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही या कालाकारांचा सहभाग होता. त्यामुळे आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.

Kangana Ranaut On Celebs In Mahadev Betting App Case:
Mukta Barve: "नाशिकला जाताना पोहे मागवले आणि...", मुक्ता बर्वेला आलेला वाईट अनुभव वाचा

त्यातच आता बॉलिवूडची पंगा क्विन कंगना राणौतचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी तिला करोडो रुपयांची ऑफर देण्यात आली होती मात्र कंगनाने ती ऑफर आणि या अ‍ॅपची जाहिरात करण्यास नकार दिल्याचा खुलासा केला. इतकच नाही तर आता कंगना रणौतने महादेव अ‍ॅप प्रकरणात सहभागी असलेल्या सेलिब्रिटींवरही निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut
Kangana Ranaut

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर याबाबच एक पोस्ट शेयर केली आहे. एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगना लिहिते की, “हे एंडोर्समेंट मला एका वर्षात जवळपास 6 वेळा आलं, प्रत्येक वेळी मला खरेदी करण्यासाठीच्या या ऑफरमध्ये अनेक कोटी रुपये जोडले पण मी प्रत्येक वेळी नाही म्हणाले. हा नवा भारत आहे, स्वतःला सुधरवा नाहीतर तुम्हाला वठणीवर आणण्यात येईल."

Kangana Ranaut On Celebs In Mahadev Betting App Case:
Tiger 3: 'टायगर'वर भारी पडेल 'झोया'! कतरिना कैफचा 'टायगर 3'मधला थरारक सीन लीक!

महादेव अ‍ॅपमध्ये पोकर, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट आणि कार्ड गेम यांसारख्या अनेक ऑनलाइन गेमवर बेटिंग केली जाते.

हे अ‍ॅप दुबईचे सौरभ चंद्राकर आणि रवी उरपल चालवत होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये महादेव अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या विवाह सोहळ्यात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता.

आता या कलाकारांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यातच आता कंगना रणौतने महादेव अ‍ॅप प्रकरणात सहभागी असलेल्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com