
'Akshay Kumar नाही, माझा निशाणा तर..', 'सेल्फी' सिनेमावर कमेंट करणं कंगनाला पडलं भारी..करु लागली सारवा-सारव
Kangana Ranaut On Selfie: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतनं अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीच्या 'सेल्फी' सिनेमाविषयी केलेल्या एका कमेंटवर आता पुन्हा स्पष्टिकरण दिलं आहे.
अभिनेत्रीनं सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनविषयी म्हटलं होतं की करण जोहर निर्मित 'सेल्फी' सिनेमानं लढत-झगडत कसेबसे १० लाख रुपयांची कमाई केली आहे.
अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी अभिनित या सिनेमाविषयी कंगनानं केलेल्या या कमेंट वरनं वादाचे सूर उमटू लागताच आता अभिनेत्रीनं त्यावर सारवा-सारव करायला सुरुवात केली आहे.
कंगना रनौतनं आपल्या इन्स्टा स्टोरीत लिहिलं होतं की,''मी तर करण जोहरचा सिनेमा असं लिहिलं होतं पण सगळीकडे गूगल विकीपिडीयात फक्त माझं आणि अक्षय सरांचं नाव लिहिलेलं दिसतंय. मी करण जोहरच्या 'सेल्फी' सिनेमाविषयी बोलले होते,कोणी त्या संदर्भात काही लिहित का नाही''.
कंगना रनौत आणि करण जोहर नेहमीच एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसले आहेत. अभिनेत्री कंगना रनौत जिथे नेपोटिझम विरोधात नेहमी बोलताना दिसते तिथे दुसरीकडे करण जोहर नेहमीच नेपोटिझमला पाठिंबा देताना दिसतो.
कंगना रनौतने करण जोहरवर निशाणा साधत वक्तव्य केलं होतं, पण ती अक्षय आणि इम्रान हाश्मीच्या सिनेमाविषयी देखील बोलत होती त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचं नावही सामिल केलं गेलं आहे.
कंगना रनौतनं आपल्या इन्स्टा स्टोरीत लिहिलं होतं की,''सध्या वेब मीडियावर अशा स्टोरीज वाचायला मिळत आहेत ज्यात 'सेल्फी'च्या अपयशासाठी मी अक्षय कुमारला दोषी मानलं असं म्हटलं जात आहे. करण जोहरचा कुठे उल्लेखच नाही,माफिया अशाप्रकारेच बातम्यांना मॅन्युपुलेट करतात..आणि मग चुकीच्या गोष्टी बातम्या बनून व्हायरल होतात''.
अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी अभिनित 'सेल्फी' सिनेमाचा पहिल्या दिवसाचा बिझनेस जवळपास ३ करोड इतका झाला आहे.