'तो अमराठी असला तरी..' मराठमोळ्या प्राजक्ताचा लव्हइंट्रेस्ट विषयी मोठा खुलासा Prajakta Mali Lovelife | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali

Prajakta Mali: 'तो अमराठी असला तरी..' मराठमोळ्या प्राजक्ताचा लव्हइंट्रेस्ट विषयी मोठा खुलासा

Prajakta Mali: प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'पटलं तर घ्या' हा चॅट शो नुकताच सुरु झाला आहे. यामध्ये नवीन एपिसोडमध्ये प्राजक्ता माळी आणि Rutuja Bagwe या दोन मराठीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.

यावेळी शो ची होस्ट जयंतीनं प्राजक्तावर लग्नाविषयी अनेक गुगली प्रश्नांचा मारा केला. तेव्हा बोलता-बोलता प्राजक्तानं आपल्या लव्ह इंट्रेस्टविषयी मोठा खुलासा करत खळबळ उडवून दिली आहे.(Prajakta Mali Lovelife Patla Tar ghya chat show )

प्राजक्ता माळी ही सध्याची मराठीतली चर्चेतील अभिनेत्री आहे. प्राजक्ता साधी शिंकली तरी तिची बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरते. त्यात ती कोणाशी लग्न करणार यावरनं तर सध्या प्राजक्ता सोडून अनेक जण मतप्रदर्शन करताना दिसत आहेत.

नुकतंच प्राजक्तानं तिचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना लग्न करणं गरजेचं आहे का? हा प्रश्न विचारला....त्यानंतर प्राजक्ता लग्न करणार नाही अशा बातम्या व्हायरल झाल्या. पण तेवढ्यात प्राजक्तानं असं काही नाही..तो एक प्रश्न होता..मी लग्न करणार असं म्हणून विषय तिथं संपवला.

पण तो विषय संपतोय नाही तोवर आता प्लॅनेट मराठीच्या चॅट शो मध्ये मुलगा अमराठी असला तरी त्याला मी मराठमोळा बनवेन असं म्हणून मॅडमनी नव्या चर्चेला हवा दिली ना...आता सोशल मीडियावर बाईंचं हे विधानही जंगी चर्चा झाडणार यात शंका नाही.

त्याचं झालं असं की 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात प्राजक्ताला ,'तू पुढच्या वर्षी लग्न करतेयस',असं ऐकलंय म्हटल्यावर.. ती पटकन उत्तरली..''हे तर मी दरवर्षी बोलते''. पण लागलीच तिनं आपण लग्न करणार..आणि मुलगा अमराठी-मराठी माहित नाही पण जरी अमराठी असला तरी त्याला मराठमोळं बनवेन असं म्हणत नवा विषय लोकांना चघळायला दिला. वर प्रोमोत याची एक झलक पहा आणि हा एपिसोड प्लॅनेट मराठीवर अपलोड झाला की आपण तो विनामूल्य पाहू शकता.