esakal | ‘देशविरोधी भूमिकेस मिळतो पाठींबा, राष्ट्रवादी म्हणजे एकटं पडणं'
sakal

बोलून बातमी शोधा

 kangana tweet against mumbai police said If you are a nationalist then you will have to stand alone

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याविरोधात कंगणानं राग व्यक्त केला आहे.  तो तिनं सोशल मीडियावर व्टिट करुन सर्वांना दाखवून दिला आहे.

‘देशविरोधी भूमिकेस मिळतो पाठींबा, राष्ट्रवादी म्हणजे एकटं पडणं'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कंगणाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. साधारण दोन तास तिची चौकशी चालली होती. यानंतर सोशल मीडियावर त्याविरोधात कंगणा समर्थक आणि विरोधक यांच्यात मोठी शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. कंगणा पोलिसांना केव्हा सामोरी जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादही समोर आले आहेत. आता कंगणानं केलेल्या व्टिटमुळे तिनं काही झालं तरी आपण शांत बसणार नाही असा इशारा कंगणानं दिला आहे.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याविरोधात कंगणानं राग व्यक्त केला आहे.  तो तिनं सोशल मीडियावर व्टिट करुन सर्वांना दाखवून दिला आहे. गेल्या वर्षभरापासून कंगणानं अनेकांची नाराजी ओढावून घेतली आहे. यात राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील बडया सेलिब्रेटींचा समावेश आहे. आताही कंगणाच्या एका विधानानं ती कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. देशद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर 8 जानेवारीला अभिनेत्री कंगना रणौत आणि बहीण रंगोली चंदेल यांचा वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवला गेला होता. 2 तासाच्या चौकशीतून हाती काय लागणार हे येत्या काही दिवसांत कळेलच.

याबाबत कंगणा म्हणाली होती की, आता माझी जी काही चौकशी करण्यात आली त्यामुळे जर कुणाच्या भावनांना ठेच लागली असेल असं मला वाटत नाही. हे तिनं पोलिसांना सांगितले होते. आता कंगणानं नव्यानं एक व्टिट करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ती म्हणाली, ज्यावेळी तुम्ही देशाच्या विरोधात भूमिका घेता त्याबद्दल मत मांडता अशावेळी तुम्हाला पाठींबा मिळतो. त्यावेळी पुरस्कारही दिले जातात. मात्र तुम्ही एखादी राष्ट्रवादी भूमिका घेऊन त्याबाबत काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मग तुमच्या पाठीमागे चौकशी सुरु होते. आपल्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी आपल्याच आपली मदत करावी लागते. या शब्दांत कंगणानं आपली खंत व्यक्त केली आहे.

कॉलेजचं तोंडही न पाहणारे बॉलिवूडचे स्टार सेलिब्रेटी; तरी मिळवलं सक्सेस !

देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे असे गुन्हे कंगणाविरोधात दाखल करण्यात आले आहे. भिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना व रंगोली सातत्याने सोशल मीडियावर अनेकांच्या विरोधात टीकाटिप्पणी करत होत्या. अशावेळी साहिल नावाच्या व्यक्तीने आक्षेप घेत वांद्रे न्यायालयात कंगना आणि रंगोली विरोधात याचिका दाखल केली होती 

loading image