'कंगणा ऐक,एवढं आंधळं होऊन चालणार नाही'

kangana tweet releted delhi strike cause of farmers law
kangana tweet releted delhi strike cause of farmers law

मुंबई - सभोवताली काहीही होऊ हे कंगणाला काही चैन पडत नाही. ती त्यावर आपली प्रतिक्रिया देण्यासाठी कमालीची उतावीळ झालेली दिसून येते. त्यावरुन तिला कोणी ट्रोल करत आहे याच्याशी तिला काहीही घेणे नाही. मागील काही दिवसांपासून दिल्लीत शेतक-यांनी शेतकरी कायद्याच्या विरोधात जो आंदोलनाचा लढा उभारला आहे त्याच्या विरोधात बोलणा-या कंगणाला बॉलीवूडमधील गायक दिलजीत दोसांज याने फटकारले आहे.

कंगणानं सोशल मीडियावर शेतक-यांच्या विरोधात घेतलेली भूमिका त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यासंदर्भात तिचं एक व्टिट चांगलेच व्हायरल होत आहे.  दिल्लीत शेतक-यांचे जे आंदोलन सुरु आहे त्याला समाजातील वेगवेगळ्या स्तरातून पाठींबा मिळताना दिसत आहे. शेतकरी कायद्याच्या विरोधात हा शेतक-यांनीच एल्गार पुकारला आहे, त्यावरुन एक झालेल्या शेतक-यांच्या आंदोलनात पंजाबातील एक आजीही सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावर कंगणाने व्टिट करुन टीका केली होती. त्याला त्या आजींनीही जशास तसे उत्तर दिले होते.

ही आजी म्हणजे भटिंडाच्या जंडियां गावातील महिंदर कौर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.त्यांनी कंगणाला उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, माझयाकडं 13 एकर जमीन आहे. त्यांना 100 रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे कंगणाला काही काम नसेल तर तिनं  माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.

आता त्यावर अभिनेता दिलजित दोसांजने ट्विट करत कंगनाला सुनावले आहे.
दिलजित दोसांजने नुकताच ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने कंगणाला सुनावले असून त्या वृद्ध महिलेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘महिंदर कौर, मी तुमचा आदर करतो. कंगणा  ऐक. बंदा इतना भी अंधा नही होना चाहिए’ अशा शब्दांत त्यानं कंगणावर टीका केली आहे.

महिंदर कौर म्हणाल्या की, कंगणाला पंजाब आणि पंजाबच्या शेतकऱ्यांची समज नाही. ती असती तर तिनं अशाप्रकारचं वक्तव्य कधी केलं नसतं. तिनं केलेलं वक्तव्य म्हणजे  डोकं नसल्याचं लक्षण आहे. ती सरकारच्या भक्तीत मनात येईल ते बोलते. तिला इतकंही नाही माहीत की, कुणाबाबत काय बोलावं. जेव्हा तिचं मुंबईतील ऑफिस तोडलं गेलं तेव्हा पूर्ण पंजाबने तिला साथ दिली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com