esakal | धक्कादायक! भावाच्या निर्घृण हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक

बोलून बातमी शोधा

Shanaya Katwe
धक्कादायक! भावाच्या निर्घृण हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक
sakal_logo
By
स्वाती वेमूल

भावाच्या हत्येप्रकरणी कन्नड अभिनेत्री शनाया काटवेला अटक करण्यात आली आहे. हुबळी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. ३२ वर्षीय राकेश काटवे याच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. या हत्येप्रकरणी इतर चार जणांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, शनायाचा भाऊ राकेशचे शीर देवरागुडीहलच्या जंगलात सापडलं, तर धडाचे तुकडे हुबळी आणि गाडाग रोडवर सापडले. धारवड पोलिसांनी नियाझअहमद काटिगर, तौसिफ चन्नापूर, अल्ताफ मुल्ला आणि अमन गिरानीवाले या चार संशयितांची ओळख पटवली आहे.

हत्येप्रकरणाचा तपास करताना पोलिसांना राकेशच्या हत्येचं कनेक्शन त्याची बहीण आणि अभिनेत्री शनायाशी असल्याचं लक्षात आलं. शनायाचं नियाझअहमद काटिगरवर प्रेम होतं आणि या दोघांच्या प्रेमसंबंधाला राकेशचा विरोध होता. त्यामुळे नियाझअहमद आणि शनायाने मिळून राकेशच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होत आहे.

आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ९ एप्रिल रोजी हुबळीला आली असताना शनायाने भावाच्या घरीच त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींनी राकेशला चाकूने ठार मारले आणि त्यानंतर नियाझ आणि इतर तिघांनी मिळून त्याच्या मृतदेहाचे तुकडे शहरातील इतर भागांत फेकून दिले.