esakal | कन्नड चित्रपट दिग्दर्शक विजय रेड्डी यांचे निधन 
sakal

बोलून बातमी शोधा

Kannada film director Vijay Reddy passes away

कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून रेड्डी यांचे नाव घ्यावे लागेल. विजय रेड्डी हे मुळचे आंध्रप्रदेश या राज्यातले. मात्र कन्नड चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांना विजय या नावाने ओळखले जाऊ लागले. एका गरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या विजय यांच्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाला मद्रास येथून सुरुवात झाली.

कन्नड चित्रपट दिग्दर्शक विजय रेड्डी यांचे निधन 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कन्नड चित्रपट सृष्टीतील महत्वाचे नाव असलेल्या विजय रेड्डी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. वेगळ्या धाटणीचे. विषयावरील चित्रपटांची निर्मिती करण्यात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य़ चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. रेड्डी यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या निधनाबाबत ट्विट करुन याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून रेड्डी यांचे नाव घ्यावे लागेल. विजय रेड्डी हे मुळचे आंध्रप्रदेश या राज्यातले. मात्र कन्नड चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांना विजय या नावाने ओळखले जाऊ लागले. एका गरीब शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या विजय यांच्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाला मद्रास येथून सुरुवात झाली. त्याठिकाणी चित्रपट या माध्यमाचे धडे गिरवल्यानंतर त्यांनी आपला एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ठसा उमटविला.

विजय यांच्या रुपेरी पडद्यावर प्रचंड लोकप्रिय झालेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे. विशेष म्हणजे त्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. 1970 मध्ये त्यांनी रंगमहाल रहस्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करत कन्नड चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख हा कायम उंचावत गेला. त्यांनी एकूण 37 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यात मौर्य, सनादी अप्पना, भक्त प्रल्हाद, काऊ बॉय कुला, ना निन्ना मरेयालारे, ऑटो राजा, देवा यासारख्या एकापेक्षा एक सरस अशा चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी 16 हिंदी तर 12 तेलगु चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.

विजय यांच्या निधनावर प्रख्यात कलाकार पुनित राजकुमार यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कन्नड चित्रपटसृष्टीला विजय यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांनी अविस्मरणीय आनंद देणा-या कलाकृती निर्माण केल्या. यात प्रामुख्याने गंधगागुडी, मौर्य, नान नी नाल आणि हलवारा यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या भक्त प्रल्हाद नावाच्या चित्रपटात मला अभिनय करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य मानतो. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली.