
Kantara Twitter Review: केजीएफचा बाप 'कांतारा', हादरवून सोडणारा, गुंगवून टाकणारा
Kantaara Twitter Review: कांतारा आता प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटानं मोठी क्रेझ निर्माण केली होती. आणि जेव्हा तो प्रदर्शित झाला त्याच्या पहिल्याच दिवशी त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. नेटकऱ्यांनी या चित्रपटाची तुलना यशच्या केजीएफशी केली आहे. केजीएफच्या दोन्ही चित्रपटांना जबरदस्त टक्कर देण्याची ताकद कांतारामध्ये असल्याचे नेटकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मुळ कन्नड भाषेतील हा चित्रपट वेगवेगळ्या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला आयएमडीबीकडून 9.5 असं रेटिंगही मिळालं आहे.
केजीएफच्या दुसऱ्या भागानं तर वेगळचं रेकॉर्ड सेट केल्याचे दिसून आले. या चित्रपटानं चारशे कोटींची कमाई केली होती. मात्र हे रेकॉर्ड तोडण्यासाठी कांतारा आल्याचे प्रेक्षक सांगत आहेत. एवढी हवा कांतारानं तयार केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्नड चित्रपटांचा बॉलीवूडवर मोठा दबदबा राहिला आहे. त्यात केजीएफ भाग 1,2 त्यानंतर चार्ली777, व्रिकांत रोना आणि जेम्स अशा चित्रपटांची नावं सांगता येतील. आता यात कांताराचे नाव जोडले गेले आहे. प्रेक्षकांनी कांताराचे कौतूक केले आहे. त्याची कथा, दिग्दर्शन, संवाद, हे सारं प्रेक्षकांना भावले आहे. ट्विटवरुनही कांताराची प्रेक्षक स्तुती करताना दिसत आहे.
कर्नाटकमध्ये 30 सप्टेंबरलाच प्रदर्शित झालेल्या कांताराची वाटचाल आता शंभर कोटींकडे सुरु झाली आहे. यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येते. आता त्याचे हिंदी व्हर्जन रिलिज करण्यात आले आहे. तुम्हाला जर क्राईम थ्रिलर या प्रकारात रस असेल तर कांतारा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्यात ऋषभ शेट्टीनं प्रमुख भूमिका साकारली असून त्यानेच दिग्दर्शनही केले आहे. कर्नाटकमधील एका स्थानिक देवतावर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. प्रेक्षकाला हादरवून टाकते.
काय आहे 'कांतारा'?
चित्रपटाची सुरुवात कर्नाटकातील मंगलोरपासून होते. तो काळ 1847 चा आहे. त्यावेळी एका राजानं ग्रामदेवता म्हणून पंजुरी देवतेला आपल्या घरी आणण्यासाठी त्या गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात जमीन दान केली होती. त्याचवेळी त्या देवतानं राजाला असे सांगितले होते की, जर तू पुन्हा ती जमीन मागितली तर मग तुला देवता कधीही माफ करणार नाही. मात्र 1970 च्या दरम्यान राजाच्या वंशातील एकाला त्या जमीनीची हाव सुटते. काही केल्या ती जमिन आपल्याला हवी. असे त्याला वाटू लागते. इथुन पुढे खरा संघर्ष सुरु होतो.
त्याचवेळी तो एका पुजेच्या दरम्यान देवता झालेल्या एका नर्तकाला प्रश्न करतो. आणि ती जमीन पुन्हा मागतो. त्यामुळे तो नर्तक नाराज होऊन पुन्हा जंगलात जातात. आणि गायब होतात. यानंतर काही दिवसानंतर राजाच्या त्या वंशजचा मृत्यु होतो. यानंतर चित्रपट आपल्याला 1990 च्या काळात घेऊन येतो. त्यात राजाचा आणखी एक वंशज (अच्युत कुमार) याची नजर त्या जमिनीवर आहे. दुसरीकडे गावातील एका स्पर्धेत विजेता झालेला शिवा (ऋषभ शेट्टी) आता गावचा राखणदार झाला आहे. त्याचे वडील यापूर्वीच त्या जंगलात गेल्यानंतर गायब झाले होते. त्यामुळे शिवाची आई ही नेहमीच त्याची काळजी करत असते.
हेही वाचा: Viral: थेट 'हनुमाना'लाच रेल्वे पोलिसांची नोटीस, 'दहा दिवसांत जर...'
काही दिवसानंतर त्या जंगलाचे नवे फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मुरलीधर (किशोर कुमारजी) यांची नियुक्ती होते. त्यांना हे जंगल रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून तयार करायचे असते. त्यामुळे साहेबाला शिवा पसंद नाही. शिवाची मैत्रीण लीला ही देखील फॉरेस्ट गार्ड आहे. आणि ती मुरलीधरच्या टीमचा एक भाग आहे. आता अशा वेगळ्याच चक्रव्युव्हमध्ये शिवा अडकला आहे. त्यातून त्याला बाहेर पडायचे आहे. तो बाहेर पडतो की नाही, जंगल सुरक्षित ठेवतो की नाही, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या पूर्वजांची ती जमीन त्या साहेबापासून सुरक्षित ठेवतो की नाही हे जाणून घ्यायचे असल्यास कांताराच्या वाट्याला जावं लागेल.
हेही वाचा: Viral: केरळ विद्यापीठात मिया खलिफा, सनी लियोनीचा 'क्लास'