Rishab Shetty: बॉलीवूड चित्रपट का होतायत फ्लॉप? कांतारा फेम ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kantara's Rishab Shetty weighs in on why Bollywood is losing its touch; says there is 'too much western influence'

Rishab Shetty: बॉलीवूड चित्रपट का होतायत फ्लॉप? कांतारा फेम ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला..

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. केजीएफ नंतर, कांतारा या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आपल्याकडे खेचले आहे. ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ऋषभ शेट्टी त्याच्या कांतारा या चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून खूप प्रशंसा मिळवत आहे. पण नुकत्याच एका मुलाखतीत त्याने बॉलीवुडच्या अपयशाबाबत भाष्य केले आहे.

हेही वाचा: Disha Patani: आधी अभिनय शिक.. अ‍ॅब्स दाखवल्यामुळे दिशा पटानी झाली ट्रोल..

ऋषभने नुकतेच मीडियाला सांगितले होते की, त्याला कांतारा चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात अजिबात रस नाही, कारण त्याने या चित्रपटाचा हिंदी डब आधीच रिलीज केला आहे. तर दुसरीकडे ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा बॉलिवूडबाबत असे वक्तव्य केले ज्याची भलतीच चर्चा होत आहे.

हेही वाचा: Vaibhav mangale: नाटकाविषयीचं हे प्रेम अत्यंत पोकळ.. वैभव मांगले यांचे खडेबोल..

ऋषभ शेट्टीने बॉलिवूडबद्दल म्हटले आहे की, सध्या बॉलिवूडमध्ये पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभाव जास्त होत आहे बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचा जास्त वापर होत आहे, स्वतःची अशी कथा नाही त्यामुळे बॉलिवूड कुठेतरी मागे पडत आहे.

ऋषभ शेट्टी म्हणाला की, 'आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो, स्वतःसाठी नाही. तर प्रेक्षकांसाठी काय योग्य आहे आणि प्रेक्षकांची आवड आपण समजली पाहिजे,कारण आधी मी पण एक प्रेक्षक होतो आता मी चित्रपट निर्माता आहे पण मला प्रेक्षकांची आवड समजुन घेणे महत्त्वाचे आहे

ऋषभ पुढे म्हणाला, 'पण आता खूप पाश्चिमात्य आणि हॉलीवूड संस्कृतीचे चित्रपट निर्माते भारतात आणयाचा प्रयत्न करत आहेत. पण मला समजत नाही की बॉलीवूडमध्ये असा का करत आहेत? हॉलीवूडमध्ये लोक आधीच ते लागू करत आहेत आणि जनताही ते पाहत आहे तर परत का तेच रिमेक बनवून सादर केले जात आहे त्यापेक्षा आपल्या कल्पनेवर चित्रपट बनवले पाहिजे त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडेल.' त्याच्या या विधानाची सध्या बरीच चर्चा आहे.

टॅग्स :Bollywood Newstollywood