Box Office: टॉलीवूडपुढे बॉलीवूडची डाळ शिजेना, कांतारानं रामसेतू, थँक गॉडचा उतरवला तोरा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Box Office collection news

Box Office: टॉलीवूडपुढे बॉलीवूडची डाळ शिजेना, कांतारानं रामसेतू, थँक गॉडचा उतरवला तोरा!

Wednesday Box Office Report: कांतारानं बघता बघता बॉलीवूडच्या चित्रपटांना हादरे देण्यास सुरुवात केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. विशेष म्हणजे साऊथमध्ये अगोदरच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं केव्हाच शंभर कोटींचा आकड़ा पार केला होता. त्यानंतर तो हिंदीत प्रदर्शित झाला.

टॉलीवूडपुढे बॉलीवूडचे काही खरं नसल्याचे दिसून आले आहे. या शुक्रवारी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा रामसेतू तर अजय देवगणचा थँक गॉड हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिले दोन दिवस त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. मात्र आता प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. याचे एक कारण साऊथचा कांतारा असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर सध्या कांतारा हा तुफान चर्चेचा विषय आहे.

ओपनिंग डे च्या दिवशी अजय आणि अक्षयच्या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला असला तरी पुढील दिवस त्यांच्यासाठी कसोटीचे ठरणार आहे. त्यांची टक्कर कांताराशी आहे. जो चित्रपट गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतो आहे. दुसरीकडे शरद केळकरच्या हर हर महादेवला देखील जेमतेम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कांताराचा प्रभाव प्रेक्षकांवर आहे. कांतारामुळे रामसेतू आणि थँक गॉडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 25 टक्क्यांची घट झाली आहे.

रामसेतूनं पहिल्या दिवशी 15.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र दुसऱ्या दिवसांपासून रामसेतूच्या कलेक्शनमध्ये घट सुरु झाली आहे. बुधवारी या चित्रपटानं 10.60 कोटी रुपयांची कमाई केल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे रामसेतूचे एकुण कलेक्शन हे 25.85 कोटी रुपये झाले आहे. आता दिवाळीच्या सुट्टयाही संपत आल्यानं प्रेक्षकांचा किती प्रतिसाद रामसेतुला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा: Virat Kohli: 'विराट तुला सात खून माफ'! जावेद अख्तरांची दिलखुलास प्रतिक्रिया

दुसरीकडे थँक गॉडच्या कमाईमध्ये देखील 25 टक्क्यांची घट झाली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं केवळ सहा कोटींची कमाई केली आहे. त्याची दोन दिवसांतील कमाई ही 15.25 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठी चित्रपट हर हर महादेवनं ओपनिंग डे ला दोन कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी 1.20 कोटींची कमाई केल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत हर हर महादेवनं 3.20 कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा: Viral Video : फिल्म प्रोड्युसरने स्वत:च्या बायकोलाच कारखाली चिरडलं; CCTV फुटेज व्हायरल