ग्रॅमीच्या ट्रॉफीवरच कान्येनं केली 'सू सू'; व्हिडीओ व्हायरल

Kanye nominated for 2021 Grammy Awards 2 months after he peed on trophy
Kanye nominated for 2021 Grammy Awards 2 months after he peed on trophy

मुंबई - संगीत जगतात अतिशय मानाचा समजला जाणा-या ग्रॅमी अॅवॉर्ड मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. प्रत्यक्षात फार कमीजणांच्या वाट्याला ते अॅवॉर्ड येतात. ज्या कलाकारांना तो पुरस्कार मिळाला आहे त्यांनी त्याचा आदर केला आहे. मात्र कान्ये वेस्ट सारखा जो एक गायक आहे त्याने त्याला मिळालेल्या ट्रॉफीवर चक्क मुत्रविसर्जन केले आहे. यावर कहर म्हणजे तो व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेयर केला आहे.

केन्या वेस्टचे 2021 च्या ग्रॅमी अॅवॉर्डसाठी नामांकन झाले आहे. त्यानंतर त्याने त्याच्या पूर्वीच्या पुरस्कारांचा अशाप्रकारे अपमान केला आहे. यामुळे जगभरातील संगीतप्रेमींकडून त्याच्यावर टीका करण्यात आली आहे. काहींनी त्याला त्याच्या अशाप्रकारच्या वागण्यावर वेगवेगळ्या कमेंटही दिल्या आहेत. रॅपर म्हणून प्रसिध्द असणा-या कान्येला त्याच्या जिझस इज किंग या अल्बमला यंदाच्या वर्षी best contemporary Christian music album category मध्ये नामांकन मिळाले होते.

सोशल मीडियावर केन्याचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याच्या अशाप्रकारच्या वागण्याचा अनेक प्रसिध्द गायिकांनी निषेध केला आहे. कान्येनं या पुरस्काराचा अपमान केला आहे. हे असे कृत्य करुन त्याला नेमकं काय सांगायचं आहे, त्याने काय साध्य होणार आहे, संगीतक्षेत्रात मोठी कामगिरी करणा-याला ग्रॅमीने सन्मानित केले जाते. दुसरीकडे अशाप्रकारची वागणूक जर त्या पुरस्काराला मिळणार असेल तर ते चूकीचे आहे.

कान्येचा फॅन फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासमोर त्याने काय आदर्श ठेवला आहे. असा प्रश्न पाश्चिमात्य जगातील काही गायकांनी कान्येला विचारला आहे.त्याच्या म्युझिक रेकॉर्डला मिळणा-या रॉयल्टीवरुन कान्या नाराज झाला आहे. ज्या रकमेवर करार साईन झाला आहे ती न देता कमी पैशांत गायकाची बोळवण केली जाते असे त्याने आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे. त्याने 10 करारावर स्वाक्षरी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com