शेहनाज बनली सिद्धार्थची 'शोना', रिलीज झाल्यावर टॉप ट्रेंडमध्ये पोहोचलं गाणं

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 25 November 2020

'बिग बॉस'च्या घरात शेहनाज सिद्धार्थला अनेकदा त्याची स्तुती करायला सांगायची मात्र सिद्धार्थ स्वतःच्याच ऍटीट्युडमध्ये असायचा. मात्र टोनी कक्कड आणि नेहा कक्कडच्या 'शोना शोना' या नवीन गाण्यातून शेहनाजच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. 

मुंबई- शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला ही जोडी 'बिग बॉस'च्या १३ व्या सिझनमधील सगळ्यात चर्चित जोडी होती. या सिझनमधील दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते वेडे झाले होते. त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यावेळी 'सिडनाज' म्हणून केलेला हॅशटॅग अजुनही दोघे एकत्र आले की तितकाच ट्रेंड होतो. 'बिग बॉस'च्या घरात शेहनाज सिद्धार्थला अनेकदा त्याची स्तुती करायला सांगायची मात्र सिद्धार्थ स्वतःच्याच ऍटीट्युडमध्ये असायचा. मात्र टोनी कक्कड आणि नेहा कक्कडच्या 'शोना शोना' या नवीन गाण्यातून शेहनाजच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. 

हे ही वाचा: जान कुमार सानूने केलेल्या आरोपांवर कुमार सानू म्हणाले, ''यापुढे मुलाला कधीही भेटणार नाही''   

'शोना शोना' या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्ला शेहनाजची स्तुती करत तिच्या मागे मागे करताना दिसतोय. याउलट शेहनाच तिच्या ऍटीट्युडमधून तिच्या अदा दाखवत आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर शेहनाजने वजन कमी केलं आणि तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं.

या गाण्यातंही ती याच अंदाज दिसून येतेय. या गाण्यात शेहनाज आणि सिद्धार्थ शेहनाज या जोडीला आवाज दिला आहे भावा बहीणीची जोडी टोनी आणि नेहा कक्कडने. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतरच सिद्धार्थ आणि शेहनाज या जोडीचं हे दुसरं गाणं आहे. याआधी दोघेही एका हार्ट ब्रेकिंग गाण्यात दिसून आले होते. हे पहिलं गाणं रिलीज झाल्यावर जसं युट्युबवर ट्रेंड होत होतं तसंच आता 'शोना शोना' हे गाणंही टॉप ट्रेंडमध्ये पाहायला मिळतंय.   

sidharth shukla and shehnaaz gill hot chemistry in new song shona shona watch here  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sidharth shukla and shehnaaz gill hot chemistry in new song shona shona watch here