व्हिडिओ: कपिल शर्माने आईसोबत केलं वर्कआऊट, एकमेकांना देत होते टक्कर

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 28 November 2020

कपिलचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय ज्यामध्ये तो ट्रेडमिलवर पळताना दिसतोय. तर बाजुला त्याची आई देखील बालकनीमध्ये वर्कआऊट करताना दिसतेय.

मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे. याआधी कपिलला फिटनेसच्या कारणावरुन चिडवलं जायचं मात्र काही दिवसांपूर्वी शेअर झालेल्या एका व्हिडिओमध्ये कपिलने एका वेबसिरीजसाठी खास ११ किलो वजन कमी केल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून कपिलच्या फिटनेसची जोरदार चर्चा आहे. यादरम्यान कपिलचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय ज्यामध्ये तो ट्रेडमिलवर पळताना दिसतोय. तर बाजुला त्याची आई देखील बालकनीमध्ये वर्कआऊट करताना दिसतेय.

बिग बॉस १४: पुढच्या आठवड्यात होणार शोचं फिनाले, सलमान खानने केली घोषणा

२०१८ मध्ये कपिल शर्माचं वजन खूप वाढलं होतं. त्यानंतर त्याने फिटनेस मनावर घेत एक्ससाईजला सुरुवात केली. आता सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने तर चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे. हा व्हिडिओ कपिल शर्माच्या फॅनपेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'आई आणि मुलगा एकत्र वर्कआऊट करताना.' या व्हिडिओच्या बॅग्राऊंडमध्ये दिल ये जिद्दी है हा गाणं वाजतंय. 

काही दिवसांपूर्वीच अर्चना पूरण सिंह यांनी शेअर केलेल्या बिहाईंड द सीन्स व्हिडिओमधून त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचा खुलासा झाला होता. कपिलने याबाबत सांगताना म्हटलं होतं की त्याचं वजन ९२ किलो होतं जे कमी करुन आता त्याने ८१ किलो केलं आहे. कपिलने ११ किलो कमी केल्याचा यात खुलासा केला होता.कपिल शर्माची पत्नी गिन्नी पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचं कळतंय. भारती सिंहच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये गिन्नी दिसली होती. ज्यामध्ये तीचं बेबी बंप दिसून आल्याने तिच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरु झाली.   

kapil sharma and his mother workout together at home video viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil sharma and his mother workout together at home video viral