बिग बॉस १४: पुढच्या आठवड्यात होणार शोचं फिनाले, सलमान खानने केली घोषणा

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 28 November 2020

सुरुवातीच्या दिवसात शो खूप स्लो होता मात्र नंतर रुळावर आला. असं असलं तरी प्रेक्षकांना 'बिग बॉस १३' सारखी मजा अनुभवायला मिळत नाहीये. या विकेंडला सलमान खान घरातील स्पर्धकांना फिनालेच्या बाबतीत सांगणार आहे.

मुंबई- 'बिग बॉस १४' मागच्या सिझनच्या तुलनेत तेवढा धमाल करु शकत नाहीये. शोची टॅगलाईन आहे सीन पलटेगा. सुरुवातीच्या दिवसात शो खूप स्लो होता मात्र नंतर रुळावर आला. असं असलं तरी प्रेक्षकांना 'बिग बॉस १३' सारखी मजा अनुभवायला मिळत नाहीये. या विकेंडला सलमान खान घरातील स्पर्धकांना फिनालेच्या बाबतीत सांगणार आहे. हे ऐकल्यानंतर घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. नवीन ट्विस्ट एँड टर्नसोबत आता या रिऍलिटी शोमध्ये मोठा धमाका होणार असल्याची चर्चा आहे.  

हे ही वाचा: सारा अली खानने धनुषसोबत केलं असं वर्कआऊट,  व्हिडिओ झाला व्हायरल  

'बिग बॉस १४' च्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये या आठवड्यात काही सेलिब्रिटी येऊन स्पर्धकांना प्रश्न विचारतील. यासोबतंच असं कळतंय की सलमान खान 'बिग बॉस'च्या फिनालेबाबत देखील घोषणा करणार आहे. मिस्टर खबरीच्या इंस्टाग्राम अकाऊंटनुसार या विकेंडला सलमान खान मोठी घोषणा करणार आहे. सलमान सगळ्यात धक्का देत सांगतो की 'बिग बॉस १४' चं फिनाले पुढच्या वर्षी नाही तर पुढच्या आठवड्यात होणार आहे. आणि फिनालेमध्ये केवळ ४ स्पर्धक असतील. या नंतर आता सोशल मिडियावर चर्चा आहे की सलमान प्रँक करत आहे. 

'बिग बॉस'च्या या विकेंडला निक्की तंबोली आणि एजाज खान सोडून बाकी सगळेजण एविक्शनसाठी नॉमिनेट झाले आहेत. एका रिपोर्टनुसार या आठवड्यात पवित्रा पुनियाला वोट्स कमी मिळाल्याने तिचा या घरातील प्रवास संपणार आहे.

गेल्या एपिसोडमध्ये पवित्रा याच गोष्टीमुळे टेन्शनमध्ये दिसून आली होती की आठवड्यात ती की घराबाहेर तर नाही जाणार ना..तेव्हा आता सलमानच्या या घोषणेवर स्पर्धक कसे रिऍक्ट होत आहेत हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.      

salman khan announces bigg boss 14 finale next week  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan announces bigg boss 14 finale next week